Bjp MP Mahesh sharma and trinamool congress Mla Rabindranath Chatterjee takes vaccine
Bjp MP Mahesh sharma and trinamool congress Mla Rabindranath Chatterjee takes vaccine 
देश

भाजप खासदार, तृणमूलच्या आमदाराने घेतली लस अन् म्हणतात, आम्ही आरोग्य कर्मचारीच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजकारण्यांनी लसीकरणाच्या रांगेत घुसू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही त्यांच्याच पक्षाचे खासदार महेश शर्मा यांनी लस टोचून घेतली. एक डॉक्टर म्हणून आपण लस घेतल्याचे त्यांनी टिव्टरवर म्हटले आहे. त्यांच्याप्रमाणेच तृणमूल काँग्रेसचे आमदार रविंद्रनाथ चॅटर्जी यांनीही लस घेतल्याची माहिती समोर आली आहे.

लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यापुर्वी पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राजकारण्यांना या लसीकरणाच्या रांगेत मध्येच न घुसण्याचे आवाहन केले होते. तेलंगणच्या आरोग्यमंत्र्यांनी आपण पहिल्यांदा लस टोचून घेत मोहिमेला सुरूवात करणार असल्याचे जाहीर केले होते. पण पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी लस घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील भाजपाचे 61 वर्षीय खासदार महेश शर्मा यांनी नोएडा येथील रुग्णालयात सकाळी 11 वाजता लस टोचून घेतली.

याबाबत त्यांनी स्वत: व्टिटरवरून माहिती दिली आहे. एक डॉक्टर म्हणून मी ही लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून प्रत्येकाने लस घ्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार रविंद्रनाथ चॅटर्जी यांनीही लस घेतली. रुग्ण कल्याणकारी समितीचा भाग असल्याने त्यांनी लस घेतल्याची माहिती आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस 50 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचाही समावेश असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे आज उद्घाटन झाले. या वेळी मोदींनी देशवासींयाशी संवाद साधला. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर मास्क लावणे, हात धुणे गरजेचे असल्याचा संदेश मोदींनी दिला. तीन कोटी लोकांना लस मोफत देणार येणार आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना मदत देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

Edited by Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT