Nishikant Dubey sarkarnama
देश

Nishikant Dubey : पाकिस्तानचा राग अळवणाऱ्या बांगलादेशाची वळवळ थांबवण्याची हिच वेळ; दुबेंनी गंगेच्या पाण्याकडे लक्ष वेधलं

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या समस्या वाढल्या आहेत. भारताने पाणी बंद करण्यासह पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Aslam Shanedivan

Pune News : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे देशभर संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जल करारास स्थगिती दिली असून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, अशी ग्वाही जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी दिली होती. ज्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बांगलादेशबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. यामुळे सध्या खळबळ उडाली आहे.

बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यापासून हिंसचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. विशेष करून हिंदू आणि भारतीय अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात भारतात मोठी आंदोलने झाली असून यात मोदी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी प्रतिक्रिया दिली होती. या हल्ल्यात दगावलेल्यांबद्दल आपल्या तीव्र शोकसंवेदना असून बांगलादेश या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटलं होतं. तर दहशतवादाविरुद्ध बांगलादेशची भूमिका ठाम असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.

पण बांगलादेशमध्ये होणारे हिंदू आणि भारतीय अल्पसंख्याक समाजावरचे अत्याचार आणि सतत भारताविरोधात ओकली जाणारी गरळ यावरून आता टीका समोर आली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ‘बांगलादेशला जाणारं गंगा नदीचं पाणी अडवा’, अशी मागणी केली आहे. त्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्लानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानंतर ही मागणी केली आहे.

दुबे यांनी, “बांगलादेशही वळवळ करत असून भारतातून बांगलादेशमध्ये वाहून जाणारे गंगा नदीचे पाणी बंद करण्याची वेळ आली आहे. आमचे पाणी पिऊन पाकिस्तानचा राग गाणार असेल तर त्यांना जागा दाखविण्याची वेळ आलीय, असे दुबे म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स समाज माध्यमावर पोस्ट केली आहे. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान भारतीय लष्कर आणि तपास यंत्रणांनी दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर देत पाच अतिरेक्यांच्या घरांना लक्ष केलं. त्यांची घरे स्फोटकांनी उडवून दिली आहेत. ही कारवाई पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ जिल्ह्यात करण्यात आली असून दहशतवाद्यांशी संबंधितांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

तसेच पहलगाम हल्ल्याचा निषेध शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून देखील करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना, सूत्रधार आणि हल्ला करणारे अतिरेकी यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT