Smriti Irani Join Bharat Jodo yatra : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहचली आहे. अशात कॉंग्रेसचे (Congress) अमेठीतील नेते दीपक सिंह यांनी भाजप खासदार स्मृती इराणी (Smriti Irani) यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. स्मृती इराणी यांचे सहाय्यक खाजगी सचिव नरेश शर्मा यांनी 28 डिसेंबर रोजी निमंत्रण पत्र सुपूर्द करत खासदार इराणी यांना भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.
“तुम्हा सर्वांना भारत जोडो यात्रेसाठी आमंत्रित करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला केली होती. मला वाटले की, सर्वप्रथम अमेठीच्या खासदार स्मृती झुबिन इराणी यांना निमंत्रण पत्र द्यावे. मी 28 डिसेंबर रोजी गौरीगंज येथे त्यांच्या कॅम्प ऑफिसला पोहोचलो आणि नरेश शर्मा यांना निमंत्रण पत्र दिले. त्यांनी माझे निमंत्रण पत्र स्वीकारले असून मी ते खासदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.
या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निमंत्रण देणे हे आपले काम आहे, मात्र या दौऱ्यात अमेठीचे खासदार व केंद्रीय मंत्री किंवा भाजपच्या कोणत्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागाचा प्रश्नच येत नाही. भाजप नेहमीच अखंड भारताच्या संकल्पनेवर काम करते. भारत अजिबात तुटलेला नाही, मग तो जोडण्याचा संबंधच नाही. जे तुटते ते जोडले जाते. मरणासन्न काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी राहुल गांधींनी ही यात्रा काढली आहे, ज्याला भारत जोडो यात्रा असे नाव दिले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राहुल 3 वेळा अमेठीतून खासदार झाले आहेत
2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला. राहुल हे अमेठीतून तीन वेळा खासदार होते. राहुल गांधींची यात्रा ३ जानेवारीला गाझियाबादमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.