Nitin Gadkari  Sarkarnama
देश

खासदार संसदेतच म्हणाले, गडकरीजी स्पायडरमॅन, जाल बिछाके रखा है!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळं महाराष्ट्रासह (Maharashtra) सर्वच राज्यांतील नेते त्यांच्या कामाचं कौतूक करतात. असंच कौतूक भाजप (BJP) खासदारांनीही केलं आहे. संसदेत लताना या खासदारांनी गडकरी हे स्पायडरमॅन (Spiderman) असल्याचं जाहीर करून टाकलं. कोळी जसं जाळं विणतो, तसं गडकरींनी देशभरात रस्त्यांचं जाळं निर्माण केलं आहे, असंही ते म्हणाले.

भाजप खासदार तापिर गाओ (Tapir Gao) यांनी सोमवारी हे वक्तव्य केलं. लोकसभेत (Lok Sabha) बोलताना त्यांनी नितीन गडकरी यांचा उल्लेख स्पायडरमॅन असा केला. गडकरी यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांच जाळं निर्माण केलं आहे. संवेदनशील असलेल्या सीमावर्ती भागातही त्यांनी रस्ते बनवले आहेत. त्यामुळे गडकरी यांचे नाव स्पायडरमॅन ठेवलं आहे, असं गाओ म्हणाले.

स्पायडरमॅन या नावाचं समर्थन करताना गाओ म्हणाले, कोळी जसं सर्वत्र जाळं तयार करतो, तसंच रस्त्यांचं जाळं गडकरी यांनी देशभरात तयार केलं आहे. मोदी सरकार आल्यानंतर चीनलगतच्या सीमेवर रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मला आशा आहे की, स्पायडरमॅन ज्या वेगाने रस्ते बनवत आहेत, त्याचे वेगाने आपण पुढे जात राहू. देश आणि पुर्वेकडील राज्य अशाच वेगाने विकसित होत राहतील, असंही गाओ यांनी नमूद केलं.

अरूणाचल प्रदेशातील महागड्या गाड्यांची रॅलीचा उल्लेख करून गाओ म्हणाले, आधी या भागात अशा गोष्टींची कल्पा करणेही कठीण होते. पण गडकरी यांच्या काळात बनलेल्या रस्त्यांना पाहून मला हे म्हणण्यात कोणताही संकोच वाटत नाही की त्यांनी देशभरात रस्त्यांचा जाळं विणलं आहे. त्यामुळे मोदी आणि गडकरी असतील तर सर्वकाही शक्य आहे, या गोष्टी खात्री पटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT