U T Khader news Sarkarnama
देश

Karnataka political controversy : विधानसभाध्यक्षांची पैशांची उधळपट्टी, भाजप खासदाराकडून 'पोलखोल'

BJP MP Accuses Karnataka Speaker U T Khader of Corruption : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून, भाजपने चौकशीची मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

BJP vs Congress Karnataka news : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून, भाजपने चौकशीची मागणी केली आहे. खादर हे सभापती पदाच्या प्रतिष्ठेला शोभेल, असे वागत नाहीत.

प्रशासकीय सुधारणांच्या नावाखाली खूप भ्रष्टाचार (Corruption) सुरू आहे. विद्यमान न्यायाधीशांकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी सभापती व खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केली.

बंगळूरमधील जगन्नाथ भवन इथल्या भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत घेत खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी हे गंभीर आरोप केले. ते पुढे म्हणाले, ‘विधानसभेच्या मुख्य दरवाजासाठी गुलाबाच्या लाकडाची कोरलेली चौकट बनवली, तेव्हापासून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले आहेत. त्यांनी हॉलमध्ये एक नवीन टीव्ही सेट बसवला. एआय मॉनिटर सिस्टम बसवण्यासाठी खूप खर्च आला. त्यांनी सर्व आमदारांना घड्याळे दिली. त्यांनी लॉबीमध्ये मसाज पार्लर शैलीतील रिक्लाइनर आणि मसाज खुर्च्या बसवल्या. आमदार आणि मंत्र्यांनी याला विरोध केला.’

जेवण, नाश्ता कशाला?

सरकारच्यावतीने सभापतींनी जेवण आणि नाश्ता देण्यास सुरूवात केली. हे आवश्यक होते का? असा प्रश्न हेगडे यांनी केला. बेडस्प्रेड बदलण्यात आले, कार्पेट घालण्यात आली. या सर्व गोष्टींबद्दल संशय निर्माण झाला आहे.

वारेमाप खर्च

आमदार निवासस्थानातील आमदारांच्या खोल्या सुरक्षित करण्यासाठी ‘स्मार्ट डोअर लॉकर्स’ बसवले. ‘स्मार्ट सेफ लॉकर्स’ही बसवले. बाजारात 10-15 हजारांना मिळणाऱ्या ‘स्मार्ट सेफ लॉकर’साठी 35 हजार मोजले आहेत. 30 हजारांना उपलब्ध असलेल्या ‘स्मार्ट एनर्जी सोल्युशन’ला 90 हजार 500 रुपये दिले आहेत. ‘स्टेनलेस स्टील वॉटर प्युरिफायर’ 16 हजार ते 53 हजारांपर्यंत ऑनलाईन उपलब्ध आहे आणि त्यासाठी 65 हजार आकारले आहेत, असे एकूण 235 खरेदी केले आहेत, असा आरोप खासदर विश्वेश्वर हेगडे यांनी केला.

पुस्तक मेळ्यावर कोटींचा खर्च

पुस्तक मेळ्यावर 4.5 कोटी खर्च झाले आहेत. आमदारांच्या घरात सोफा आणि टेबले लावली आहेत. यू. टी. खादर अजूनही परदेशात आहेत. त्यांनी किती देशांना भेट दिली? त्यांनी किती खर्च केला आणि सरकारने त्यांना किती पैसे दिले, असा जाब त्यांनी विचारला. किती दौरे केले? कोणासोबत दौरा केला आहे? हे सर्व उघड करणे आवश्यक आहे, अशी मागणी विश्वेश्वर हेगडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT