mukhtar abbas naqvi  rahul gandhi
mukhtar abbas naqvi rahul gandhi  sarkarnama
देश

राहुल गांधी म्हणजे, 'फुल टाइम पर्यटन अन् पार्टटाइम राजकारण

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीला परदेशाच्या “छोट्या दौऱ्यावर” गेलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी (mukhtar abbas naqvi) यांनी हल्लाबोल केला आहे. या दैाऱ्यावरुन त्यांनी गांधींची खिल्ली उडवली आहे. नकवी माध्यमांशी बोलत होते. राहुल गांधी यांचा परदेश दैाऱ्याबाबत नकवी म्हणाले, ''राहुल गांधी (rahul gandhi) यांचा परदेश दैारा हा नेहमीप्रमाणे 'फुलटाइम पर्यटन अन् पार्टटाइम राजकारण असतो'

मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, ''सगळ्यात जुना पक्ष असलेल्या कॉग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमी त्यांच्या सवयींनुसार परदेश दैाऱ्यावर असतात, ही त्यांची जुनी सवय आहे,'' नकवी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दैाऱ्यातील सुरक्षेबाबत झालेल्या चुकीवरुन पंजाब कॉग्रेसवर हल्लाबोल केला.

मोदींच्या सुरक्षेबाबत विरोधक राजकारण करीत आहेत. हा गंभीर विषय आहे. पंजाब कॉग्रेस या विषयावरुन देशाचे लक्ष हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप नेहमीच सामान्य जनतेसाठी काम करणारी पार्टी आहे. निवडणुक असो किंवा नसो जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे कार्यक्रर्ते नेहमीचं अग्रेसर असतात. यामुळे गेल्या ५ ते ६ वर्षांच भाजप देशात निवडणुकांमध्ये ७० टक्के विविध जागांवर विजयी झाला आहे.

राहुल गांधी हे “छोट्या परदेश दौऱ्यावर” गेल्याची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती. राहुल गांधी हे छोट्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याविषयी अफवा पसरवू नयेत, असे सुरजेवाला यांनी चारच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. राहुल गांधी यांचा हा “छोटा परदेश दौरा” आता मात्र दीर्घ काळाचा ठरताना दिसत आहे. आता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राहुल गांधी भारतात परत येणार असल्याचे वृत्त आहे.

राहुल गांधी हे “छोट्या परदेश दौऱ्यावर” गेल्याची बातमी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती. राहुल गांधी हे छोट्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत. भाजप नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याविषयी अफवा पसरवू नयेत, असे सुरजेवाला यांनी चारच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. राहुल गांधी यांचा हा “छोटा परदेश दौरा” आता मात्र दीर्घ काळाचा ठरताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी आढळली. सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन झाले. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधानांची खिल्लीही उडवली आहे. राहुल गांधी यांचे परदेश दौऱ्यावर असताना भारतात या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. भारतातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी अनेक ट्विट राहुल गांधी यांनी परदेशातूनच केली आहेत. परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांचे अद्याप एकही ट्विट आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT