Amit Shah, Sharad Pawar Sarkarnama
देश

Amit Shah News : पवारांना त्यांच्या मुलीला अन् ठाकरेंना त्यांच्या मुलाला..! अमित शहांचा दिल्लीतून निशाणा

Rajanand More

New Delhi News : भाजपच्या दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. घराणेशाहीचा उल्लेख करत त्यांनी शरद पवारांसह उध्दव ठाकरेंनाही लक्ष्य केले. त्यांनी इंडिया आघाडीचा उल्लेख 2G, 3G आणि 4G असा उल्लेख केला. तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Amit Shah News)

घराणेशाहीवरून टीका करताना अमित शाह म्हणाले, घराणेशाही असलेल्या पक्षांचे नेतृत्व काँग्रेस (Congress) करत आहे. आमची प्राथमिकता देश आहे. आम्ही देशाच्या विकासाचा विचार करतो. पण विरोधी पक्षातील नेते त्यांना मुलांना पंतप्रधान, मुख्यमंत्री बनविण्याचा विचार करतात. दलित, आदिवासी आणि मागास समाजाचा वोट बँक म्हणून विरोधी पक्षांनी खूप उपयोग करून घेतला.

सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला पंतप्रधान करायचे आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) त्यांच्या मुलीला तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. लालूप्रसाद यादव व मुलायमसिंह यादव यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. भाजपमध्ये घराणेशाही असती तर चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान बनू शकला नसतो. विरोधी पक्षांमध्ये लोकशाही नसल्याचा हल्लाबोल शहांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चौथ्या पिढीपर्यंत नेते बदलत नाहीत

देशात 2G, 3G आणि 4G पक्ष आहेत. 2G म्हणजे घोटाळा नाही. 2G चा अर्थ दुसरी पिढी, 3G म्हणजे तिसरी पिढी आणि 4G म्हणजे चौथी पिढीपर्यंत विरोधी पक्षांचा नेता बदलत नाही. जर एखादा नेता पुढे गेला तर त्याला मागे खेचले जाते. आज ते नेते भाजपमध्ये सहभागी होत लोकशाहीच्या यात्रेत सहभागी झाले आहेत, असे शाह म्हणाले.

देशाने 75 वर्षांत 17 लोकसभा निवडणुका, 22 सरकारे आणि 15 पंतप्रधान पाहिले. देशातील प्रत्येक सरकारने परिस्थितीनुसार विकास करण्याचा प्रयत्न केला. पण समग्र विकास, प्रत्येक क्षेत्रातील विकास आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचे काम केवळ नरेंद्र मोदी यंनी दहा वर्षांत केले आहे. भाजपने दहा वर्षांत भ्रष्टाचार, घराणेशाही समाप्त करून विकासाचे राजकारण पुढे आणले, असे शाह यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT