Narendra modi  Sarkarnama
देश

BJP Politics : PM नरेंद्र मोदींना मोठा दिलासा, विरोधात गेलेला मित्रपक्ष परतला? 'त्या' विधेयकांना जाहीर पाठींबा!

BJP Akali Dal : अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला बादल यांनी पाठींबा दिला.

Roshan More

BJP News : कधीकाळी भाजपचा मित्रपक्ष असलेला अकाली दल शेतकरी आंदोलनानंतर भाजपपासून दूर गेला. मात्र, हा दूरावा आता कमी होताना दिसत आहे. विरोध भाजपला अडचणीत पकडत असताना अकाली दलाने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा दिला आहे.

लोकसभेत अकाली दलाचा एकच खासदार आहे. मात्र, अगामी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा पाठींबा महत्त्वाचा मानला जातो आहे. पंजाब विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची देखील चर्चा आहे.

अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला बादल यांनी पाठींबा दिला.

पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढतील, याची अधिकृत माहिती दोन्ही पक्षातील नेत्यांनी केली नाही. मात्र, बादल यांनी पाठींबा दिल्याने दोन्ही पक्षांतील जवळीक वाढल्याची चर्चा आहे.

बादल यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चंदीगढ येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी केली. तसेच केंद्रात मतदारसंघ पुनर्रचनेत प्रत्येक राज्यातील मतदारसंघ 50 टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला समर्थन देखील दिले आहे.

भाजप, काँग्रेसचा व्हिप

भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक तसेच एफसीआरए लोकसभेच्या पटल्यावर मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 10 तारखेला भाजपसह एनडीएतील खासदारांनी दिल्लीत उपस्थित राहावे, अशा कडक सूचना भाजपकडून करण्यात आल्या आहेत. तसेच व्हिप जारी करण्यात आला आहे. तर, भाजपच्या हालचालीनंतर कांग्रेस देखील सावध झाली आहे.  तीन ओळींचा व्हिप जारी करत काँग्रेसने देखील आपल्या खासदारांना 10,11 आणि 12 ऑगस्टला संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT