BJP Sarkarnama
देश

Bjp News : भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण ? शनिवारच्या बैठकीत होणार चर्चा

Sachin Waghmare

New Dilli News: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपकडून नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. येत्या काळात चार राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अनेक संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. त्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक 17 ऑगस्टला होत आहे.

या बैठकीत संघटनात्मक बदलासोबतच लोकसभा निवडणुकीत काही राज्यात भाजपला (Bjp) मोठा धक्का बसला आहे. त्यावरही चिंतन केले जाणार आहे. त्यासोबतच या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याने राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Bjp News)

शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संघटनात्मक निवडणुकांना बैठकीत अंतिम रुप देण्यात येणार आहे. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती या बैठकीतआखण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चा

या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याने भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार ? यावर सध्या चर्चा सुरू आहे. दुसरीकडे अध्यक्ष ठरविण्याबाबत पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला या वरिष्ठ पदावर बसवण्याची रणनीती असू शकते. त्यामुळे ऐनवेळी ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे दिली जाऊ शकतात.

शनिवारच्या बैठकीत चिंतन

या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत केंद्रीय नेतृत्व नवीन अध्यक्ष पदाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT