Rajya Sabha Election Sarkarnama
देश

Rajya Sabha Election : ‘ऑपरेशन कमळ’चा काँग्रेस आमदारांवर दबाव; क्रॉस-व्होटिंगची भीतीनं आठ आमदारांना हलविले

Amid BJP alleged “Operation Lotus” in the Odisha Rajya Sabha election, Karnataka Deputy CM D.K. Shivakumar meets eight BJD and Congress MLAs staying in Karnataka : ओडिशा राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दबाव वाढवल्याने, बीजेडी आणि काँग्रेसने आमदारांना कर्नाटक इथं हलवलं आहे.

Pradeep Pendhare

Operation Lotus politics : राज्यसभा निवडणुकीमुळे ओडिशामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने ऑपरेशन कमळ हाती घेतलं असून, यातून काँग्रेस आमदारांवर दबाव वाढवला आहे.

भाजपचा दबावाला रोखण्यासाठी काँग्रेसचे कर्नाटकमधील प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः मैदानात उतरले आहेत. ओडिशातील काँग्रेस आमदारांच्या शिवकुमार स्वतः संपर्कात आहेत.

शिवकुमार म्हणाले, "राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी भाजप (BJP) ‘ऑपरेशन कमळ’ राबवत असून आमच्या आमदारांना मोठमोठ्या ऑफर देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र बिजू जनता दल, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांनी एकत्र येऊन एकमताने उमेदवार उभा केला आहे. यामुळे ‘इंडिया’ आघाडी अधिक मजबूत होत आहे. भाजप नेहमीप्रमाणे आपले काम करत आहे, आणि आम्ही आमचे काम करत आहोत."

‘‘ओडिशा पीसीसी अध्यक्षांनी मला फोन करून सांगितले की, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन एका डॉक्टरांना स्वतंत्र उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उभे केले आहे. पक्षाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी असल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी इथं येण्यास सांगितले. ओडिशाच्या सर्व आमदारांची जबाबदारी आमची आहे. त्यांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे. इथं कोणीही येऊ शकत नाही,’’ असे शिवकुमार (D.K. Shivakumar) यांनी सांगितले.

शिवकुमार यांनी, ओडिशातील आमदार स्वतः बंगळूरला आले आहेत. त्यांनी आरामात राहण्यासाठी जागा मागितली म्हणून व्यवस्था केली. ते आमचे पाहुणे आहेत. तसेच पक्षाने या संदर्भात कोणतीही विशेष जबाबदारी दिलेली नाही, असे सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा काँग्रेसने आपल्या आठ आमदारांना कर्नाटकात हलविले असून, ते सध्या बंगळूरपासून सुमारे 35 किमी अंतरावरील एका रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, भाजपकडून होणाऱ्या कथित घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ओडिशातील काँग्रेसच्या आमदारांना शिवकुमार यांनी भेट घेत चर्चा केली.

ओडिशात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होणार असून, पाच उमेदवार रिंगणात आहेत. 147 सदस्यीय विधानसभेत भाजपकडे 79 आमदार आणि तीन अपक्षांचा पाठिंबा मिळून 82 मते आहेत, तर बिजू जनता दलाला (बीजेडी) एक जागा निश्चित मिळू शकते. चौथ्या जागेसाठी आवश्यक असलेली 30 पहिल्या पसंतीची मते कोणत्याही पक्षाकडे नाहीत.

बीजेडीने संतृप्त मिश्रा आणि दत्तेश्वर होता यांना उमेदवारी दिली असून, यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. भाजपने मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तसेच अपक्ष दिलीप रे यांनाही पाठिंबा दिला आहे. बीजेडी-काँग्रेसचे हे समीकरण भाजपला तीन जागा जिंकण्यापासून रोखण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT