Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश?' ; भाजपचा चिमटा!

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray at Congress Melava : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या सद्भभावना मेळव्यास हजेरी लावली. याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करताना त्यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा गमचा घातला गेला आणि उद्धव ठाकरे यांनीही हसत तो स्वीकारला. नंतर त्यांनी यावरील त्यांची भूमिकाही स्पष्ट केली. मात्र आता त्यांनी काँग्रेस पक्षाचा गमचा घातल्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपने(BJP) ट्वीट करत म्हटले की, 'सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच मात्र, आता काँग्रेसचा दुपट्टादेखील त्यांनी स्वीकारला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला.'

तसेच ‘माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही’ अशी ठाम भूमिका त्यांची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळवून, फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला.' अशा शब्दांत भाजपने उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) टीकास्त्र सोडले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले? -

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, 'आज मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितला की काँग्रेसच्या(Congress) कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का?. मगाशी मी तो काँग्रेसचा गमचाही घातला, एक आदर केला मान ठेवला. आता उद्या नक्कीच फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मो तो गमचा घातला. कारण, स्वत:चं कर्तृत्व सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाहीच. मग आपण काय करतोय हे मोठं करून दाखवायचं. दाखवा, काय दाखवायचंय ते दाखवा. यावेळी थोडक्यात वाचलात. नाहीतर देशाने यांना बरोबर हात दाखवला होता.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT