UP Bypoll Results Latest Update
UP Bypoll Results Latest Update Sarkarnama
देश

UP Bypoll Results : योगींनी पुन्हा करून दाखवलं; अखिलेश यांचा बालेकिल्ला भूईसपाट

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. दोन्ही जागांवर विजय मिळवत भाजपने समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले भूईसपाट केले आहेत. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्ये तर पक्षाचे नेते व आमदार आझम खान यांचा गड मानल्या जाणाऱ्या रामपूरमध्ये भाजपना सपाला धूळ चारली. अखिलेश यांच्यासाठी दोन्ही निकाल धक्कादायक मानले जात आहेत. (UP Loksabha Bypoll Results Latest News)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली मार्च महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीतही योगींचा करिष्मा चालला.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अखिलेश (Akhilesh Yadav) आणि आझम खान यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रत्येक फेरीत दोन्ही पक्षांचे उमेदवार मागेपुढे होते. त्यामुळे अत्यंत अटीतटीची या लढती झाल्या.

आझमगडमध्ये सपाने धमेंद्र यादव यांना मैदानात उतरवलं होतं. तर भाजपने पुन्हा एकदा दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यावर विश्वास दाखवला होता. निरहुआ यांनी हा विश्वास सार्थ ठरवत तीन लाख 12 हजार 768 मतं मिळवली. तर धर्मेंद्र यादव यांना तीन लाख चार हजार 89 मतं मिळाली. बसपाचे उमेदवार शाह आलम गुड्डू जमाली यांना 2 लाख 66 हजार मतं मिळाली आहे.

रामपूरमध्ये सुरूवातीला आझम खान यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली होती. पण नंतर मोहम्मद आसिम रझा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात भाजपने घनश्याम लोधी यांना तिकीट दिले होते. या चुरशीच्या लढतीत लोधी यांनी रझा यांचा 42 हजार 192 मतांनी पराभव केला आहे.

लोधी हे काही वर्षांपूर्वी आझम खान यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जात होते. पण जानेवारी महिन्यात ते भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर आझम कान यांच्या राजीनाम्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांनाच मैदानात उतरवले. भाजपच्या या खेळीने विरोधकांना गारद गेले. मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मिळवलेला हा पहिला मोठा विजय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT