BJP Politics news  Sarkarnama
देश

BJP Political News : भाजपचा 2024 च्या लोकसभेसाठी 'मास्टर प्लॅन'; देशभरातील 'ओबीसी' मतदारांची बांधणार मोट

Deepak Kulkarni

सचिन वाघमारे-

Lok sabaha Electaion : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. येत्या काळात भाजपचे सर्व लक्ष ओबीसी मतदारांवर आहे. ओबीसी मतदार जोडण्यावर त्यांच्याकडून भर देण्यात येत आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ओबीसी मतदार भाजपशी जोडण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करण्याचे आदेश नेत्यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी व ओबीसी मते वाढवण्यासाठी देशभरातील ओबीसी मतांना लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजातील असल्याने ते ब्रँड अॅम्बेसिडर असणार आहेत. त्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशातील पहिले ओबीसी पंतप्रधान आहेत, असा प्रसार आणि प्रचार केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी देशभरातील ओबीसी नेत्यांची बैठक भाजपच्या मुख्यालयात बोलावली होती. या बैठकीत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री किशोर प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती, एस. पी. सिंह बघेल, खासदार रमेश विदोडी, बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी, तेलंगणाचे खासदार लक्ष्मण यांच्यासह देशभरातील भाजपचे ओबीसी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणनीतीकडे असणार सर्वांचे लक्ष...

या वेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व लक्ष ओबीसी मतदारांवर केंद्रित केले असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय ओबीसी(OBC) मतदार भाजपला जोडण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न करण्याचे आदेश या नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून आखल्या जाणाऱ्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT