Donald Trump Sarkarnama
देश

Donald Trump: टॅरिफचा गेम ओव्हर! ट्रम्प यांच्या मनमानी कारभाला सुप्रीम कोर्टाचा सुरुंग; अधिकारच नसल्याचं केलं स्पष्ट

Donald Trump: इतर देशांवर अशा मनमानी पद्धतीनं टॅरिफ लावण्याचा अध्यक्षांना कोणताही अधिकार नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

Amit Ujagare

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला असून त्यांच्या मनमानी कारभारला अमेरिकनं सुप्रीम कोर्टानं चाप लावला आहे. ट्रम्प यांनी इतर देशांवर लावलेले वाढी टॅरिफ कोर्टानं रद्दबातल ठरवले आहेत. असं टॅरिफ ठरवण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याद्वारे विविध देशांवर लावण्यात आलेल्या टॅरिफला रद्दबातल ठरवलं आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं ट्रम्प यांच्या आर्थिक अजेंड्याच्या एका महत्वपूर्ण मुद्दयाची हार झाल्याचं मानलं जात आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ट्रम्प यांच्याकडून आपत्कालीन शक्तींच्या कायद्यांतर्गत एकतर्फी लावण्यात आलेल्या टॅरिफवर केंद्रीत आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की, १९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती अधिनियमांतर्गत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाजवळ सर्व अमेरिकेच्या व्यापारी भागिदारी देशांकडून येणाऱ्या सामानांवर सरसकट आयात शुल्क लावण्याचा अधिकारच नाही.

कोर्टाचा बहुमताचा निर्णय

अमेरिकन सुप्रीम कोर्टानं ६-३ अशा बहुमतानं टॅऱिफ बेकायदा असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळं जागतीक व्यापार, व्यावसाय, ग्राहक, महागाई यांनी देशभरातील देशांच्या जीडीपीवर मोठा प्रभाव पडू शकतो. कोर्टाच्या या निर्णयामुळं मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिणाम होणार आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील टॅक्स फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळं २०२५ मध्ये प्रत्येक अमेरिक कुटुंबाला जवळपास ११०० अमेरिकनं डॉलरचा अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सोसावा लागला.

भारत आणि अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या व्यापार करारानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आल्यानं आता भारतालाही यामुळं मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण दुसरीकडं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता ट्रम्प काय निर्णय घेतात किंवा काय खेळी खेळतात हे पाहावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT