Prashant Kishor Sarkarnama
देश

Prashant Kishor Arrested : हायव्होल्टेज ड्रामा ; प्रशांत किशोर यांना अंधारातच पोलिसांनी उचलले; नेमकं काय घडलं

Prashant Kishore Detained : आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारात अंधारातच प्रशांत किशोर झोपले असता पोलिसांनी त्यांना उचलले. त्यांना दिल्लीच्या एक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

Bihar News: बिहारमधील बीपीएससी परीक्षा गैरव्यवहाराच्या विरोधात आंदोलन करणारे जनसुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. प्रशांत किशोर हे गांधी मैदानावर आंदोलन करीत होते. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारात अंधारातच ते झोपले असता पोलिसांनी त्यांना उचलले. त्यांना एक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारात पाटणा पोलीस गांधी मैदानावर पोहचली. त्यावेळी प्रशांत किशोर झोपले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

दोन जानेवारीपासून प्रशांत किशोर गांधी मैदानावर उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आहे. डॅाक्टरांनी त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचे सांगितले होते, पण प्रशांत किशोर यांनी कुठलाही उपचार न घेता त्यांचे आंदोलन सुरुच ठेवले.

गांधी मैदानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, यात पोलीस त्यांना उचलून नेत असल्याचे दिसते. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी विरोध केला. गांधी मैदानात पाच लाख विद्यार्थी एकत्र आले आहेत. या परीक्षा गैरव्यवहारामुळे युवकांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. आम्ही एका क्रुर सरकारचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारने गेल्या तीन वर्षात 87 वेळा लाठीचार्ज केला आहे, असा आरोप प्रशांत किशोर यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना केला आहे.

प्रशांत किशोर यांची प्रकृती स्थिर असल्याचे पाटण्याचे जिल्ह्याधिकारी के डीएम चंद्रशेखर यांनी सांगितले. दरम्यान आज अकरा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रशांत किशोर यांना कुणालाही भेटण्यास पोलिसांनी मनाई केली आहे, दुसरीकडे आदोलन आता रस्त्यावर उतरले आहेत. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT