Yogi Adityanath
Yogi Adityanath 
देश

आरटीओ दलाली,अवैध वाहतुक रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ अॅक्शन मोडमध्ये

सरकारनामा ब्युरो

Yogi Adityanath Latest news update

लखनौ : उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अवैध वाहतूक, आरटीओमधील दलाली, रस्त्यांवरील स्टंटबाजी राेखण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. आरटीओतील दलाली रोखण्यासाठी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासठी काेणत्याही परिस्थितीत माफियांचे कंबरडे माेडा, अशा थेट सूचनाच त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अवैध बांधकामांवर बुलडाेझर चालवून केलेल्या धडक कारवाईने याेगी आदित्यनाथ चर्चेत आले होते. आता त्यांनी अधिकाऱ्यांना माफियांचे कंबरडे माेडण्याचे आणि रस्त्यांवर काेणत्याही अवैध कारवाया चालू न देण्याच्या धडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- अवैध बस, एसटी स्टॅंड आणि डग्गामार बसेस थांबवा

'' चोविस तासांत अवैध बस,एसटी स्टॅंड हटवा. एक जरी माफिया जाेडला गेला तर त्याची गॅंग तयार हाेईल, त्याची आर्थिक स्थिती मजबूत झाली तर ताे तुमचे जगणंही मुश्लिक करील, म्हणून त्याच्या आर्थिक नाड्या आताच आवळायला हव्यात. त्यासाठी बेकायदेशीर बस, एसटी स्टॅंड आणि डग्गामार बसेस थांबवा.

माफियांपासून मुक्ती

आरटीओ कार्यालयांना दलालांपासून मुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन द्या; पण त्याआधी तो लायक आहे की नाही, हेही तपासा.

कंबर ताेडणारे स्पीडब्रेकर नकाे

रस्त्यांवर कंबर ताेडणारे स्पीड ब्रेकर कुठेच नकाेत. जिथे असतील तिथून लवकर हटवा. रुग्ण, गर्भवती महिलांना या कंबर तोड स्पीड ब्रेकरचा त्रास हाेताे. टेबलटाॅप स्पीड ब्रेकर बनावा.

रस्त्यांवरची ओव्हरलाेड वाहने हटवा

रस्त्यांवर, रस्त्याच्या कडेला ओव्हरलाेड झालेली वाहने नकाेत. त्यामुळे रस्ते खराब हाेतात. जिथे वाहने ओव्हरलाेड हाेतात ती केंद्रे हटवण्यासाठी सुरुवात करा.

रस्त्यांवरील पार्किंग

रस्त्याच्या कडेला काेणतेही वाहन उभे राहणार नाही. अशा वाहनेही अपघाताला कारणीभूत ठरतात. वाहनांसाठी विशेष पार्किंगची जागा द्या. ज्या ढाब्यांबाहेर ट्रक उभे राहतात. तेथे पार्किंगची जागा नसल्यास असे अवैध ढाबेदेखील हटवा.

तरुणांची स्टंटबाजी राेखा

ओव्हर ब्रिज किंवा फ्लायओव्हरवर स्टंट करणाऱ्या तरुणांना काेणत्याही परिस्थितीत राेखायला हवे. सोबतच वाहने चालवताना हेल्मेट वापरण्यासाठी जनतेत जनजागृती करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT