Brij Bhushan On Phogat, Punia sarkarnama
देश

Brij Bhushan : पुनिया अन् फोगाट यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ब्रिजभूषण सिंह यांचा हल्लाबोल; म्हणाले, दोन वर्षांपूर्वी...

Brij Bhushan On Phogat, Punia : कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी पुनिया आणि फोगाटवर निशाणा साधला आहे. सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका केली आहे.

Akshay Sabale

कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप काही महिला कुस्तीपटूंनी केले होते. त्यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन उभे केले होतं. त्यात कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट सुद्धा सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंह यांना कुस्ती संघटनेचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. तसेच, सिंह यांच्यावर गंभीर गुन्हेही दाखल झाले आहेत.

यातच आता कुस्तीच्या फडातून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट राजकारणाच्या मैदानात आले आहेत. पुनिया आणि फोगाट यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये ( Congress ) प्रवेश केला आहे. त्यावरून कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह ( Brij Bhushan Sharan Singh ) यांनी पुनिया आणि फोगाटवर निशाणा साधला आहे. त्यासह सिंह यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरही टीका केली आहे.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी कुस्तीपटूंनी 18 जानेवारीला एक कट रचण्यास सुरूवात केली होती. मी म्हणालो होतो की, हा एक राजकीय कट आहे. यात काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा सहभागी होते. पूर्ण कट रचण्यात आला होता. हे आंदोलन कुस्तीपटूंचं नव्हतं, हे दोनवर्षांपूर्वी स्पष्ट झालं होतं. या नाटकात काँग्रेसही सहभागी होती."

"मी गुन्हेगार नाही. कोण गुन्हेगार असेल, तर ते बजरंग आणि विनेश फोगाट आहेत. या कटाची स्क्रिप्ट भूपेंद्र हुड्डा यांनी लिहिली होती. यांनी पाऊणे दोन वर्षे कुस्तीमहासंघाचं कामकाज बंद पाडलं," असा आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी केला.

"बजरंग चाचणीशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत गेला हे खरे नाही का? मला कुस्ती तज्ञ आणि विनेश फोगाट यांना विचारायचे आहे की, एक खेळाडू एका दिवसांत दोन वजनात ट्रायल देऊ शकतो का? पाच तास कुस्ती थांबवता येते का? तुम्ही कुस्ती जिंकून गेला नाहीत, तर फसवणूक करून गेला आहात. युवा कुस्तीपटूंच्या हक्कांचं उल्लंघन करून तुम्ही गेला. देवानं तुम्हाला तिथेच शिक्षा केली," असा टोला सिंह यांनी फोगाट यांना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT