Brij Bhushan Singh  Sarkarnama
देश

Brij Bhushan Singh Case FIR Update : ब्रिजभूषण सिंहांवरील FIR मध्ये गंभीर बाबी उघड ; श्वास तपासण्याच्या नावाखाली टी-शर्ट..

WFI chief Brij Bhushan Singh news : विनयभंगाच्या दहा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

WFI chief Brij Bhushan Singh news : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे.

त्यांच्या अटकेची मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत. अशातच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दाखल असलेल्या दोन एफआयआर (FIR) मधील माहिती समोर आली आहे. यात त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकरणातब्रिजभूषण सिंह व सचिव विनोद तोमर हे मुख्य आरोपी आहेत. ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंचा अनेकदा विनयभंग केला. त्यांना वाईट हेतूने स्पर्श केला. श्वास तपासण्याच्या नावाखाली त्यांचे टी-शर्टही काढले, आदी गंभीर आरोप कुस्तीपटुंनी केले आहेत.

यात सात कुस्तीपटुंनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. अल्पवयीन कुस्तीपटुं खेळाडूचा विनयभंग केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आला आहे. यात विनोद तोमर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विनयभंगाच्या दहा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

कुस्तीपटुंच्या पोटाला हात लावल्याचा ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप केला आहे. जखमी महिला खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. खेळाडूंनी यास नकार दिला असता त्यांनी चाचणीमध्ये त्यांच्याशी भेदभाव केला, असे तक्रारीत म्हटलं आहे.

ब्रिजभूषणने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. कथितपणे टी-शर्ट काढले. श्वास तपासण्याच्या नावाखाली अयोग्यरित्या स्पर्श केला, असा आरोप एका कुस्तीपटुंने केला आहे.

बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेले आरोप

  • ब्रिजभूषण यांनी अल्पवयीन खेळाडूला आपल्या खोलीत बोलावले. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

  • एका महिला कुस्तीपटूने म्हटले आहे की, एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेवेळी एका हॉटेलमध्ये जेवताना तिला स्पर्श केला.

  • ब्रिजभूषण यांच्यापासून वाचण्यासाठी कुस्तीपटू एकटीने नव्हे तर समूहात चालत असत

  • उपचाराच्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी त्यांनी केली.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT