Hyderabad News : तेलंगणचे मुख्यमंत्री व बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी नुकतीच आषाढी वारीच्या निमित्ताने सुमारे ६०० वाहनांचा ताफा घेऊन सोलापूर, पंढरपूर आणि तुळजापूर दौरा करीत महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने बीआरएसने तयारी सुरू केली आहे. बीआरएस पक्षाची काल बुधवारी (दि.२६ जुलै) हैदराबादमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्रातील १५ जणांची समिती नेमण्यात आली.
महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्यासाठी १५ जणांच्या समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीकडून आगामी आठ दिवसात सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि राज्याचे पदाधिकारी निवडण्यात येणार असल्याचे समजते. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असून, त्यासाठी बीआरएसची रणनीती ठरली आहे.
या समितीत प्रभारी म्हणून आमदार संजीव रेड्डी ( तेलंगणा), खासदार बी. पी. पाटील (झारखंड), आमदार शकील अहमद (बोधन), माणिक कदम (अध्यक्ष किसान सेल, महाराष्ट्र), हिमांशू तिवारी (राष्ट्रीय सरचिटणीस), प्रवीण जेथेवाड, मौलाना कादीर, हर्षवर्धन जाधव, शंकर धोंडगे, अभय चिकटगावकर, अण्णासाहेब पाटील, दिलीप गोरे, शिवराज बांगर, संतोष माने-पाटील, नागनाथ घिसेवाड (सर्व महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.
बीआरएस पक्षाच्या १५ जणांच्या समितीत सोलापूरचे माजी खासदार धर्माण्णा सादूल यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय पंढरपूरचे नेते भगीरथ भालके, सोलापूरचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्याकडे कोणते पद दिले जाणार याची उत्सुकता आहे. (Latest Marathi News)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.