B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa News
B. S. Yediyurappa and Son B.Y. Vijayendra, BJP News, Karnataka News, B. S. Yediyurappa News Sarkarnama
देश

BS Yediyurappa : येडियुरप्पांचा उत्तराधिकारी ठरला; विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : कर्नाटकाच्या (Karnataka) राजकारणात दबदबा असलेले नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असून मुलाला मतदारसंघ सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांच्या शिकारीपुरा या मतदारसंघातून विजेयेंद्र हे भाजपचे उमेदवार असतील. (B. S. Yediyurappa Latest News)

विजेयेंद्र यांना भाजपकडून (BJP) सातत्याने डावलले जात असल्याची तक्रार येडियुरप्पा यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात होती. त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेती संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. सध्या ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

आता येडियुरप्पाच आपल्या मुलासाठी धावून आले आहेत. पुढील निवडणुकीत आपल्या मुलाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. पक्षात डावलले जात असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ही घोषणा केली आहे.

गुरूवारी माध्यमांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले होते की, कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्तेत येऊ देणार नाही. काँग्रेस नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद आहे. राज्यात पुन्हा भाजपच सत्तेत येणार असून मुख्यमंत्री भाजपचा होईल, असा विश्वासही येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, येडियुरप्पा यांनी आपला मतदारसंघ मुलासाठी सोडण्याची घोषणा केल्याने ते राजकारणातून संन्यास घेणार का, या चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी निवडणूक न लढण्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांची राज्याच्या राजकारणात नेमकी भूमिका कोणती राहणाल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT