BSP Mayawati  Sarkarnama
देश

BSP Mayawati : कोणत्या 'फेक न्यूज'वर भडकल्या मायावती; म्हणाल्या...

BSP meeting attended by Mayawati : सक्रिय राजकारणातून निवृत्ती होण्याच्या बातम्यांवर मायवती यांनी प्रतिक्रिया देत उद्या मंगळवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचे सांगितले.

Pradeep Pendhare

Uttar Pradesh News : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सक्रिय राजकारणापासून निवृत्ती होण्याच्या घोषणेवर, तसंच जातीनिहाय जनगणनेवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेवर मोठं भाष्य केलं.

सक्रिय राजकारणातून निवृत्ती घोषणेच्या बातम्या फेक असून, पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आहे. हे काम जातीयवादी माध्यमांतून होत आहे, असा गंभीर आरोप मायावती यांनी केला.

मायवती म्हणाल्या, "डॉ. भीमराव आंबेडकर आणि कांशीराम यांच्याप्रमाणेच आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बसपा (BSP) आणि त्याच्या चळवळीला समर्पित राहणार आहे. माझ्या अनुपस्थितीत किंवा गंभीर आजाराच्या परिस्थितीत आकाश आनंदला माझे उत्तराधिकारी म्हणून पुढे काम करतील". तेव्हापासून जातीयवादी माध्यमे, सेवानिवृत्तीच्या फेक न्यूज देत आहेत. याकडे आपण दुर्लक्ष करत असून पुढील काळात 50 टक्के तरुणांना पक्षात पदाधिकारी बनवणार असल्याचे मायावती यांनी सांगितले.

मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. गेस्ट हाऊस घोटाळ्यात काँग्रेसचे (Congress) इरादे उधळले गेले. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव होता. कांशीराम त्यावेळी आजारी होती. अशास्थितीत देखील त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडून गृहमंत्र्यांच्या विरोधात जाऊन संसदेला घेराव घातल्याची आठवण मायावतींनी करून दिली.

काँग्रेस कपटी

बसपाने 2 जून 1995 रोजी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्यावर काँग्रेस कधीच काय बोलत नाही. केंद्रात असलेल्या काँग्रेसने त्यावेळी योग्य अशी जबाबदारी पार पाडली नाही. केंद्रातील सरकारचे बसपाबाबत चुकीची भूमिका घेतली होती. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावून सरकार घालवायचे होत. काँग्रेसचा हा कट बसपाने हाणून पाडल्याचे मायावती यांनी म्हटले.

जातनिहाय जनगणनेसाठी पाठपुरावा

बसपा अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आणि भाजपकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. जात जनगणना झाल्यानंतर काँग्रेस एससी-एसटी आणि ओबीसी वर्गांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ शकेल का? एससी-एसटी आरक्षणातील वर्गीकरण आणि क्रिमी लेयरच्या मुद्द्यावर काँग्रेस अजूनही गप्प आहे, असे मायावती यांनी म्हटले.

राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या मंगळवारी प्रदेश कार्यालयात होणार असून, त्यात मायावती यांच्याकडे पुन्हा पक्षाची कमान सोपवण्यात येणार आहे. याशिवाय राजकीय प्रस्तावही मांडण्यात येणार आहे. या बैठकीत देशभरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि यूपीच्या पोटनिवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक मायावती करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT