Mohan Bhagwat Sarkarnama
देश

Mohan Bhagwat : मुस्लिमही RSS मध्ये येऊ शकतात का? स्वयंसेवकाच्या प्रश्नावर मोहन भागवतांनी दिलं उत्तर, पण ठेवली एक अट...

Mohan Bhagwat on Muslims in RSS : स्वयंसेवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, आरएसएसमध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे. पण, यासाठी एक अट आहे.

Ganesh Sonawane

RSS Membership Rules: सरसंघचालक मोहन भागवत हे चार दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. तेथे एका स्वयंसेवकाने त्यांना प्रश्न केला. मुस्लीम आरएसएसमध्ये (RSS) येऊ शकतात का? असा तो प्रश्न होता. यावर मोहन भागवत यांनी सूचक असं उत्तर दिलं आहे.

मोहन भागवत यांनी रविवारी (दि. 6) वाराणसीतील लाजपत नगर कॉलनी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली. त्यावेळी जातभेद संपवणे, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसंबधी ते बोलत होते. त्याचवेळी मुस्लीम समाजाच्या संघ सहभागाविषयी त्यांना एका स्वयंसवेकाने प्रश्न केला.

स्वयंसेवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, आरएसएसमध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे. पण, यासाठी एक अट आहे. ती म्हणजे, शाखेत येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 'भारत माता की जय' ही घोषणा देताना किंवा नारा देताना मनात कोणत्याही प्रकारचा संकोच वाटता कामा नये आणि त्या व्यक्तीने भगव्या ध्वजाचा आदर करायला हवा' असं भागवत म्हणाले. त्यानंतर आता त्यांचे हेच उत्तर सगळीकडे चर्चिले जात आहे.

मोहन भागवत पुढे म्हणाले, आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे अनेक लोक असले तरी आपल्या सगळ्यांची संस्कृती सारखीच आहे. भारतातील सर्व धर्म, पंथ आणि जातीतील लोकांचे प्रत्येक शाखेवर स्वागत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.

तसेच भागवतांनी ५ एप्रिल रोजी काशीच्या वैदित विद्वानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना, भारत देशाला विश्वगुरु बनवायचे आहे. त्यासाठी कठोर मेहनत व परिश्रम घ्यावी लागणार असल्याचं भागवत म्हणाले.

१९२५ मध्ये संघाची स्थापना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही एक हिंदूत्ववादी सामाजिक आणि कौटुंबिक संघटना आहे. सामाजिक व सांस्कृतिक संस्था या स्वरूपात ही संघटना काम करीत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक शाखांमध्ये स्वयंसेवक दैनंदिन हजेरी लावतात. सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या "शुक्रवारी" या नागपूर येथील निवासस्थानी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT