Canada-India Dispute : Sarkarnama
देश

Canada-India Dispute : कॅनडाच्या पंतप्रधानांचा सूर बदलला; भारताबाबत अखेर नरमाईची भूमिका...

Chetan Zadpe

Canada News : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावताना हा आरोप निरर्थक असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात कॅनडाने काहीशी नरमाईची भूमिका घेतली असून, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा सूर बदलला आहे. भारतासोबत येत्या काळात चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले होते. मात्र, आता प्रधानमंत्री जस्टिन ट्रूडो यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत भारतासोबतचे आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. येत्या काळात भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी कॅनडा कटिबद्ध आहे. येत्या काळात दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील. त्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्याची तयारीही कॅनडाने दर्शवली आहे.

गुरुवारी (दि.२८ सप्टेंबर) रात्री उशिरा झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी महत्त्व देणार असल्याचे सांगितले. येत्या काळात दोन्ही देशांदरम्यानचे संबंध मजबूत करण्यावर भर देणार असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी स्पष्ट केले. भारत मोठी आर्थिक ताकद आहे. त्यामुळे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT