Rahul Gandhi On Modi Sarkar Sarkarnama
देश

Rahul Gandhi On Adani : अदानींना वाचवण्यासाठीच माझी खासदारकी रद्द केली; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

Rahul Gandhi On Modi Sarkar : "मध्य प्रदेश हा भ्रष्टाचाराचा केंद्र..."

Chetan Zadpe

Madhya Pradesh News : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३० सप्टेंबर) शनिवारी राहुल गांधी यांची मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे सभा झाली. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, जातिनिहाय जनगणना, भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या असे मुद्दे मांडले. या वेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका करतानाच खासदार पदावरून अपात्रता भाष्य करत उद्योगपती अदानी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

पक्षाच्या प्रचारासाठी भाषण करताना राहुल गांधी म्हणाले, "मी संसदेमध्ये उद्योगपती अदानींबाबत सातत्याने बोलतो, त्यामुळे मला लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र करण्यात आले. तुम्ही जरा विचार करा, केवळ अदानींना वाचवण्यासाठी माझे लोकसभेचे सदस्यत्व तत्परतेने रद्द करण्यात आले. मला याची कसलीही पर्वा नाही. मी नेहमी खरे बोलतो. सरकारचा रिमोट कंट्रोल अदानीजींच्या हातात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

मध्य प्रदेश भ्रष्टाचाराचे केंद्र -

राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यातील शिवराज सरकारला चांगलेच धारेवर धरले. "मध्य प्रदेश हे भारतातील भ्रष्टाचाराचे केंद्र आहे. जेवढा भ्रष्टाचार भाजपच्या लोकांनी मध्य प्रदेशात केला आहे तेवढा संपूर्ण देशात झाला नाही. मुलांचा निधी, माध्यान्ह भोजनाचा निधी, शालेय गणवेशाचा निधी चोरीला गेला, महाकाल कॉरिडॉरमध्ये भाजपने पैसे चोरले. व्यापम घोटाळा याबाबत तुम्हाला सर्वांना माहिती आहे, असा वारही गांधींनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT