BS Yediyurappa
BS Yediyurappa Sarkarnama
देश

BS Yediyurappa : प्लास्टिकच्या पिशव्या अन् धुराळा..; माजी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँडिंग होताना निष्काळजीपणा

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : भाजपचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठी दुर्घटना होता होता टळली. त्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

कलबुर्गीमधील जेवारगी येथे येडियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर लँड करत असताना हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळे परिसरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात हवेत पसरल्या. त्यामुळे हवेत कचरा, प्लॅस्टिक पिशव्या आणि धुराळाच दिसू लागला.

त्यामुळे हेलिकॉप्टर लँड करताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे शेवटच्या क्षणी पायलटने आपला निर्णय बदलला आणि येडियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर पुन्हा हवेत झेपावलं. जेवारगी येथे सोमवारी हा प्रकार घडला.

यानंतर या हेलिपॅडच्या परिसरातील सर्व कचरा आणि माती साफ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्यात आलं. मात्र, लँडिंगच्या शेवटच्या क्षणी पायलटने आपला निर्णय बदलल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, कर्नाटकमध्ये काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सध्या राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. तर भाजप नेते येडियुरप्पा हे कामानिमित्त कलबुर्गीमधील जेवारगी येथे आले असता त्यांचे हेलिकॉप्टर लँडिंग होताना हा निष्काळजीपणाचा प्रकार घडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT