Lalu Prasad Yadav  Sakranama
देश

Lalu Prasad Yadav : लालू 'या' घोटाळ्यामुळे अडचणीत; 'CBI'ला खटल्यासाठी मिळाली परवानगी

CBI to prosecute Lalu Prasad Yadav in land scam case : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबियाच्या नोकरीच्या मोबदल्यात जमीन घेतल्याच्या घोटाळ्यात अडचणी वाढल्या आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार आहेत. नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याप्रकरणात 'CBI'ने लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी मागितली होती, त्याला गृहमंत्रालयाने मंजुरी दिली.

या खटल्यात 30 पेक्षा अधिक आरोपी असून, त्यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी प्रलंबित आहे. 'CBI'ने अन्य आरोपींविरुद्ध मंजुरीसाठी आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने 'CBI'ला इतर आरोपींविरुद्ध मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया जलद करण्यास सांगितलं असून, पुढील सुनावणी 15 ऑक्टोबरला होणार आहे.

या प्रकरणात पूर्वी न्यायालयाने लालू प्रसाद यादव, तेज प्रताप आणि तेजस्वी यादव यांना 'ED'च्या तपासासंदर्भात समन्वस बजावले होते. घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात इतर आरोपींनाही समन्स बजावण्यात आलं होते. न्यायालयाने सर्वांना 7 ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितलं आहे. 'ED'ने 6 ऑगस्टला 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, त्यातील चौघांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.

तेज प्रताप यादव यांचा सहभाग?

दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांनी आरोपींना समन्स बजावलं आहे. तेज प्रताप यादव यांचा देखील यात सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं न्यायालयानं (Court) म्हटलं आहे. यात अखिलेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी किरण देवी यांना न्यायालयानं समन्स पाठवलं आहे.

जमिनी नावावर करून घेतल्या

लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 मध्ये हा घोटाळा केला असून, यात अनेकांना रेल्वेच्या विविध झोनमध्ये 'ग्रुप-डी' पदांवर नोकरी देण्यात आली होती. या बदल्यात लोकांनी आपली जमीन लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर केली, तसेच एके इन्फोसिस्टम या संबंधित कंपनीला दिली, असा आरोप आहे.

विजय सिंगलावर मनी लाँड्रिंगचा आरोप

यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेले पवन बन्सल यांचे पुतणे विजय सिंगला यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत. या प्रकरणीही 'CBI' ने विजय सिंगला यांच्यासह 10 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात विजय सिंगला यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT