Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : सर्वोच्च न्यायालयात जामीनाच्या सुनावणीपूर्वीच CBI नं केजरीवालांविरोधात उचललं मोठं पाऊल

Akshay Sabale

CBI Arrested Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणेने ( सीबीआय ) अबकारी धोरण प्रकरणात रात्री अटक केली आहे. केजरीवालांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. 21 मार्च रोजी ईडीनं केजरीवालांना अटक केली होती.

केजरीवालांच्या जामीन याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच 'सीबीआय'नं त्यांना अटक केली आहे.

सोमवारी 'सीबीआयनं' (Cbi) तिहार तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांची चौकशी केली. अबकारी धोरण प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात केजरीवालांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच 'सीबीआय'नं हे पाऊल उचललं आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. "सरकार केजरीवालांविरोधात कट रचत आहे. 'सीबीआय'नं त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल आहे. सर्वोच्च न्यायालयातून केजरीवालांना जामीन मिळणार होता. त्यापूर्वी भाजप (BJP) सरकारनं सीबीआयसोबत मिळून कट रचत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सगळा देश केजरीवालांसोबत उभा आहे," असं संजय सिंह यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT