CBI 
देश

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला सीबीआयकडून अटक

नऊ लाखांचे कर्ज बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आसामचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिवंगत नेते हितेश्वर सैकिया (Hiteshwar Saikia) यांच्या मुलाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 25 वर्षांपूर्वीच्या कर्ज प्रकरणात सैकिया यांचा मुलगा अशोक (Ashok Saikia) यांना रविवारी रात्री सीबीआयने (CBI) अटक केली. अशोक यांनी नऊ लाखाचे कर्ज बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशोक यांचे बंधू देवव्रत (Debabrata Saikia) यांच्या भाजप प्रवेशासाठी या दबावतंत्राचा भाजपकडून वापर केला जात असल्याचा आरोप काँगेस नेत्यांनी केला आहे.

अशोक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. अनेकदा नोटीस पाठवूनही ते न्यायालयासमोर हजर होत नव्हते, असं सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक यांचे मोठे बंधू देवव्रत सैकिया हे आसाम विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. अशोक यांना रविवारी सायंकाळी सीबीआयचे अधिकारी चौकशीसाठी घेऊन गेले होते. रात्री त्यांना अटक करण्यात आल्याचे देवव्रत यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना देवव्रत सैकिया म्हणाले, हे खूपच दुर्दैवी आहे. वकीलांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात सीबीआयने हस्तक्षेप करायला नको होता. अशोक यांनी यापूर्वीच एक सहकारी ग्रामीण बँक, एस्कार्ड बँकचे कर्ज फेडलं आहे. माझा लहान भाऊ निर्दोष आहे. अशोक यांनी 2025 पर्यंत सर्व कर्ज फेडले असल्याने त्यांची सुटका होईल, असा विश्वास सैकिया यांनी व्यक्त केला.

दरम्यान, हितेश्वर सैकिया हे आसामचे दोनवेळा मुख्यमंत्री होते. 1983 ते 1985 आणि 1991 ते 1996 या कालावधीत त्यांनी आसामचे नेतृत्व केले. 1996 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आसामध्ये अजूनही सैकिया यांच्या कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे काँग्रेसकडून देवव्रत यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली.

अशोक हे एक व्यावसायिक आहेत. त्यांच्या अटकेविषयी बोलताना एक नेता म्हणाला, देवव्रत सैकिया यांच्यावर भाजपमध्ये प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. पण ते कधीच भाजपमध्ये जाणार नाहीत. भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपकडून देशभरात याच पध्दतीचा वापर केला जात असल्याची टीका या नेत्याने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT