CBI Diamond Jubilee Celebrations Sarkarnama
देश

CBI Diamond Jubilee Celebrations; 'सीबीआय' हा न्यायाचा ब्रँड; पंतप्रधान मोदींकडून सीबीआयवर कौतुकाचा वर्षाव!

PM Narendra Modi | सहा दशकांमध्ये सीबीआय ने मोठा प्रवास केला आहे. सीबीआयने आपल्या कामाने, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला.

सरकारनामा ब्युरो

CBI Diamond Jubilee Celebrations : देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची मुख्य जबाबदारी आहे. भ्रष्टाचार हा सामान्य गुन्हा नाही. भ्रष्टाचार गरिबांचे हक्क हिरावून घेतो आणि अनेक गुन्ह्यांना जन्म देतो. लोकशाही आणि न्यायाच्या मार्गात भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे. असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केलं.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) आज (3 मार्च) 60 वर्षपूर्तीनिमित्त हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही (सीबीआय) देशाची प्रीमियम तपास संस्था म्हणून साठ वर्षांचा प्रवास पूर्ण केला. ही सहा दशकांमध्ये सीबीआय ने मोठा प्रवास केला आहे. सीबीआयने आपल्या कामाने, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला.

आजही जेव्हा एखाद्याला एखादे प्रकरण असाध्य आहे, असे वाटते तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली जाते.पंचायत स्तरावर प्रकरण असले तरी ते सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होते. सीबीआय हा न्यायाचा ब्रँड म्हणून नावारुपास येत आहे."

कोट्यावधी भारतीयांनी येत्या 25 वर्षांत भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे.व्यावसायिक आणि प्रभावी संस्थांशिवाय विकसित भारताची निर्मिती शक्य नाही. त्यामुळे सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे. गेल्या सहा दशकात सीबीआयने एक बहुआयामी आणि अतिशय शिस्तबद्ध तपास संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली.आज सीबीआयची व्याप्ती मोठी झाली आहे. सीबीआयला महानगरापासून जंगलापर्यंत धाव घ्यावी लागत आहे. असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT