नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्या तब्बल वीस वर्षे कथित योगीच्या सल्यानुसार शेअर बाजार चालवत होता. योगीच्या नादी लागणे त्यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागानंतर (IT) आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कारवाई सुरू केली आहे. आता त्यांना न्यायालयानेही दणका दिला आहे. (Share Market News)
या प्रकरणी अडचणीत येताच चित्रा रामकृष्ण यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दणका देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आता चित्रा रामकृष्ण यांना कधीही अटक होऊ शकते. काही दिवसांपूर्वी रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांचा फास दिवसेंदिवस आवळत आहे. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना आता परदेशात पलायन करता येणार नाही.
या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून घेतलेल्या वादग्रस्त निर्णय होता. तसेच, वेतन देतानाही अनियमितता दिसून आली आहे, असे सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)
'सेबी'ने (SEBI) चित्रा रामकृष्ण यांच्या चौकशी प्रकरणी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनएसईमध्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. योगीच्या सल्ल्यानुसार त्या शेअर बाजार चालवत होत्या. त्या मागील वीस वर्षांपासून योगीच्या संपर्कात होत्या. आता त्यांच्याभोवती प्राप्तिकर विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. त्यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी गोपनीय माहिती योगीला दिल्याचा दाट संशय आहे. (Chitra Ramkrishna News)
योगीच्या सल्ल्याने रामकृष्ण यांनी 2013 मध्ये शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार म्हणून आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांची नियुक्ती केली होती. तसेच त्यांच्या वेतनातही भरमसाठ वाढ करण्यात आली. पण हे सुब्रमण्यमचं कथित योगी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नव्हते. एनएसईच्या 27 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्रात याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, योगी वापरत असलेला rigyajursama@outlook.com हा ईमेल आयडी सुब्रह्मण्यमचा होता, असे सेबीच्या आदेशात म्हटले आहे. एनएसईने याबाबतचा सविस्तर अहवाल मे व जुलै 2018 मध्ये सेबीला पाठवला असून त्यामध्येही कथित योगी सुब्रह्मण्यमच होता, असे नमूद करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.