Chief Minister Basavaraj Bommai
Chief Minister Basavaraj Bommai Sarkarnama
देश

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर; मुख्यमंत्र्यांची गाडी अडवत घेतली झाडा-झडती

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत.

काँग्रेस, भाजप आणि स्थानिक पक्षांनीही जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र, निवडणुका जाहीर होताच निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आलं आहे.

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने नियमांचं काटेकोरपणे पालन होण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दोड्डबल्लापूर येथील श्री घाटी सुब्रमण्य मंदिरात जात होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कारची झाडा-झडती घेत चौकशी केली. यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या गाडीमध्ये पथकाला काहीही सापडलं नाही.

दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होत आहेत. यासाठी कर्नाटकात 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटकमध्ये राजकारण तापलं आहे.

या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे निवडणूक आयोगाची पथकं झाडा-झडतीची कारवाई करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT