Central Government Bonus One Month Salary Eligibility sarkarnama
देश

Central Government: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महिन्याच्या पगाराएवढा मिळणार बोनस,"तुम्ही पात्र आहात का? आत्ताच तपासा

Central Government Bonus One Month Salary Eligibility: केंद्रीय निमलष्करी दल, सशस्त्र दल आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.

Mangesh Mahale

📌 3 Point Summary

  1. एक महिन्याच्या पगाराइतका बोनस – केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना पगाराएवढा बोनस देण्याची घोषणा केली आहे.

  2. पात्रता नियम स्पष्ट – हा लाभ फक्त पात्र कर्मचाऱ्यांनाच मिळणार असून, अटींचे पालन आवश्यक आहे.

  3. उत्सवाचा लाभ – हा बोनस उत्सव काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येतो.

दिवाळी पूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांनी गिफ्ट दिले आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराएवढा उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) मंजूर करण्यात आला आहे. ३० दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार असून ही रक्कम ६,९०८ रुपये निश्चित करण्यात आली आहे. याबाबत अर्थमंत्र्यालयाने आदेश काढला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारच्या गट क आणि गट ब कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे.

मंत्रालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरता हा बोनस फक्त मर्यादित नसून केंद्रीय निमलष्करी दल, सशस्त्र दल आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. संबंधितांना ३० दिवसांच्या पगाराएवढा अॅड हॉक बोनस मिळणार आहे. केंद्र सरकारने Non-Productivity Linked Bonus (Ad-hoc Bonus) देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत अटी

  • या बोनससाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी इतर कोणताही बोनस किंवा एक्स-ग्रेशिया मिळत नसावा.

  • हा बोनस ३१ मार्च २०२५ पर्यंत सेवेत असलेल्यांना आणि ६ महिने सतत काम करणाऱ्यांना दिला जाणार आहे.

  • कर्मचारी देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, फक्त त्यांच्या सेवेत कोणताही खंड नसावा. कॅज्युअल कामगारांनाही हा बोनस मिळणार आहे.

  • बोनसची रक्कम १,१८४ रुपये निश्चित करण्यात आली आहे. आंशिक कालावधीसाठी काम करणाऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.

रक्कम आणि गणना पद्धत

  • बोनसाची रक्कम ३० दिवसांच्या पगाराइतकी आहे.

  • पगाराची मर्यादा (ceiling) ₹7,000 आहे.

  • गणना सूत्र: 7,000 × 30 ÷ 30.4 = ₹6,908 बोनस.

❓ FAQs

Q1: केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार आहे?
➡️ एक महिन्याच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे.

Q2: हा बोनस कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे?
➡️ फक्त पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना.

Q3: बोनस देण्यामागचा उद्देश काय आहे?
➡️ उत्सव काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे.

Q4: बोनससाठी अर्ज करावा लागेल का?
➡️ नाही, पात्र कर्मचाऱ्यांना बोनस आपोआप मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT