Narendra Modi sarkarnama
देश

Central Govt Employees : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राने लागू केली नवी सिस्टिम; पाहा, तुम्हाला कसा होणार फायदा?

Benefits of new government system for employees : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी सिस्टिम लागू केली आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्हाला काय फायदे मिळणार, जाणून घ्या.

Rashmi Mane

सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारी नवी सिस्टिम आणली आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अकाउंट म्हणजेच वेतन खाते पॅकेज सुरु केलं आहे. या नव्या सिस्टिममुळे कर्मचाऱ्यांना एकाच अकाउंटमधून बँकिंग, विमा आणि कार्डशी संबंधित अनेक फायदे मिळणार आहेत. तसेच हे खाते झिरो बॅलन्स असणार आहे.

या योजनेचा उद्देश आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सुविधांसाठी वेगवेगळे खाते काढण्याची गरज भासू नये. एकाच खात्यामध्ये सर्व सुविधा मिळाल्यामुळे वेळ आणि पैसा नक्कीच वाचणार आहे.

ही सुविधा केंद्र सरकारच्या ग्रुप A, B आणि C मधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले विद्यमान सॅलरी अकाउंट सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत अपग्रेड किंवा माइग्रेट करून घ्यावे, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. मात्र, या योजनेत सध्या ग्रुप D कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

कशा असणार सुविधा?

बँकिंग सुविधांबाबत सांगायचे झाले तर हे खाते पूर्णपणे झिरो बॅलन्स असणार आहे. RTGS, NEFT आणि UPI व्यवहार पूर्णपणे मोफत असतील. चेकबुकची सुविधा मिळेल तसेच लॉकर भाड्यावर सवलत किंवा माफी दिली जाऊ शकते. याशिवाय गृहकर्ज, शिक्षण कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर कमी व्याजदर आणि कमी प्रोसेसिंग फीचा लाभ मिळणार आहे.

विमा आणि कार्डशी संबंधित फायदे या खात्याचे विशेष आकर्षण आहेत. या पॅकेजमध्ये 1.5 कोटी रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा आणि 2 कोटी रुपयांपर्यंत हवाई अपघात विमा देण्यात येणार आहे. तसेच 20 लाख रुपयांपर्यंत इनबिल्ट टर्म लाईफ इन्शुरन्सचा समावेश असून गरजेनुसार त्याची रक्कम वाढवता येईल. आरोग्य विम्यामध्ये कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचा समावेश असेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डवर विमानतळ लाउंज अ‍ॅक्सेस, रिवॉर्ड पॉइंट्स आणि कॅशबॅकसारख्या सुविधा मिळणार आहेत. एकूणच, ही नवी सिस्टिम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT