Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींचा दिल्लीतील पत्ता बदलला; आता निर्णय त्यांच्या हाती...

Rajanand More

New Delhi : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दिल्लीतील पत्ता आता बदलणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्याच तोडीचा आलिशान बंगला सरकारने त्यांना दिला आहे. दिल्लीतील सुनहरी बाग येथे पाच क्रमांकाचा बंगला त्यांना मिळाला असल्याचे समजते.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीसंह राहुल गांधी यांनी शुक्रवारी या बंगल्यात जाऊन त्याची पाहणी केली. बराचवेळ त्या बंगल्यात थांबल्या होत्या. त्यामुळे राहुल लवकरच या बंगल्यात राहण्यासाठी येतील, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

राहुल गांधी मागील वर्षी खासदारकी जाईपर्यंत तुघलक लेनवरील बंगला क्रमांक 12 मध्ये राहत होते. मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने शिक्षा स्थगित केल्यानंतर त्यांना खासदारकी आणि बंगला दोन्ही मिळाले होते. पण बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर राहुल आई सोनिया गांधी यांच्याच घरात राहत आहेत.

राहुल लोकसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे त्यांना मंत्र्यांसाठीचा आलिशान बंगला देण्यात आला आहे. प्रियांका यांनी बंगल्याची पाहणी केली असली तरी राहुल या बंगल्यात येणार का, याबाबत उत्सुकता आहे. मागील काही महिन्यांपासून ते आईच्याच घरी राहत आहे.

दरम्यान, राहुल गांधी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर कोर्टात हजर झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मानहानी केल्याचा खटला सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी ते आले होते. त्यांनी आपण शाह यांचा अपमान केला नसल्याचे स्पष्ट करत आपले म्हणणे मांडले. आता पुढील महिन्यात या खटल्यावर पुढील सुनावणी होणार असून तक्रारदारांच्या बाजूने पुरावे सादर केले जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT