nara lokesh lead tdp padyatra news update
nara lokesh lead tdp padyatra news update sarkarnama
देश

TDP : 'भारत जोडो' नंतर आता आणखी एक पदयात्रा ; 'या' राज्यात नवं नेतृत्व येतयं उदयास

सरकारनामा ब्युरो

nara lokesh : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे, अशीच एक यात्रा तेलुगू देशम पार्टीकडून (टीडीपी) काढण्यात येणार आहे. (nara lokesh lead tdp padyatra news update)

आंध्र प्रदेशच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी पक्षानी (tdp)रणनीती आखली आहे.

तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचे यापुत्र नारा लोकेश नायडू (nara lokesh) यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. टीडीपीतर्फे त्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकेश या ४ हजार किमी पदयात्रेचे नेतृत्व करणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सुत्रांनी सांगितले. युवा गलम (युवकांचा आवाज) या पदयात्रेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजय न झाल्यास, माझी ती शेवटची निवडणूक असेल असे चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केले आहे. त्याच्या या विधानामुळेही राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त जात आहे. नायडूंच्या या घोषणेनंतर नायडू यांचे पुत्र एन लोकेश नायडू यांच्याकडे टीडीपीचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

युवा गलम (युवकांचा आवाज) ही पदयात्रा एकूण ४०० दिवसांची असून यात्रेच्या माध्यमातून ४ हजार पायी प्रवास केला जाणार आहे. येत्या २७ जानेवारी रोजी या यात्रेची सुरुवात होणार आहे.

कोण आहेत लोकेश नायडू

  • लोकेश यांनी मे २०१३ मध्ये राजकारणात प्रवेश केला.

  • स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतलेले आहे.

  • २०१५ मध्ये सत्तेत आल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी लोकेश यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती.

  • नायडू यांनी लोकेश यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद सोपवले होते.

  • २०१७ मध्ये विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडणूक आले.

  • लोकेश यांना आयटी, पंचायतराज, ग्रामीण विकास विभागाचे मंत्रीपद देण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT