Jagdish Tytler Sarkarnama
देश

Jagdish Tytler : 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय; काँग्रेस नेत्याला दणका

Jagdish Patil

Jagdish Tytler News : काँग्रेस (Congress) नेते जगदीश टायटलर यांच्यावर 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी (ता. ३० ऑगस्ट) रोजी टायटलर यांच्याविरोधात हत्येच्या गुन्ह्यांसह विविध कलमान्वये आरोप निश्चित करत कोर्टाने त्यांना मोठा दणका दिला आहे.

तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 सप्टेंबरला होणार असून यावेळी टायटलर (Jagdish Tytler) यांना कोर्टाने हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने टायटलर यांच्याविरोधात भादंवि कलम 302, 147, 109 अनुक्रमे खून, दंगल आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणे यासह इतर कलमान्वये आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीत (Delhi) 1984 च्या शीखविरोधी दंगलीत पुल बंगश येथे झालेल्या काही शीख नागरिकांच्या हत्याप्रकरणी दिल्ली कोर्टाने टायटलर यांच्यावरील आरोप निश्चित केले. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, टायटलर यांनी गुरुद्वारा साहिबजवळ दंगलखोरांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते.

याच दंगलखोरांनी तीन शीख नागरिकांच्या गळ्यात टायर घालून त्यांना पेटवून त्यांची हत्या केली होती. जमावाने गुरुद्वारा साहिबलाही आग लावली होती. या जमावाला टायटलर यांनी हिंसा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर होता, ते आरोप आता निश्चित झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT