Shivaji Maharaj Sarkarnama
देश

Chhatrapati Shivaji Statue News : धक्कादायक : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिक रस्त्यावर..

Chhatrapati Shivaji Statue Tamilnadu : कुल्लितुरई येथील घटना

सरकारनामा ब्यूरो

Shivaji statue was allegedly vandalised unknown miscreants tamilnadu: कन्याकुमारी (तामिळनाडू) जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

'एएनआय' या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हा घटनेनंतर येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली असून कन्याकुमारी पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कन्याकुमारी जिल्ह्यातील कुल्लितुरई येथील ही घटना आहे. स्थानिक नागरिकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, "भारत माता की जय"च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी आता पुतळ्याला कपड्याने झाकून ठेवलं आहे.

कन्याकुमारीचे पोलीसअधीक्षक हरि कृष्ण प्रसाद म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे थोडे नुकसान झाले आहे. आम्ही याबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पथक नेमण्यात आले आहे, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत," (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT