Chhattisgarh Assembly Election Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडमध्ये भाजप-काॅंग्रेसमध्ये पाठशिवणीचा खेळ...

Jagdish Pansare

Chhattisgarh Assembly News : छत्तीसगड विधानसभेची सत्ता कोणाच्या हाती याचा फैसला अवघ्या तासाभरात समोर येणार आहे. सर्वच कल चाचण्यांमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होणार हे दर्शवण्यात आले होते. (Chhattisgarh Assembly Election) आत प्रत्यक्ष निकाल येण्यास सुरुवात झाली तेव्हा याचा अनुभव पदोपदी येऊ लागला आहे.

भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये अक्षरशः पाठशिवणीचा खेळ सुरू असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसत आहे. कधी काँग्रेस (Congress) आघाडीवर, तर कधी भाजप त्यांना मागे टाकत पुढे निघत आहे. भाजपच्या गोटात उत्साह सुरू होत नाही, तोच पुन्हा आघाडी-पिछाडीचे आकडे बदलताना दिसत होते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Chhattisgarh) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेसने आघाडी घ्यायला सुरुवात केली, पण काहीवेळाने भाजपने मुंसडी मारत काँग्रेसला मागे टाकले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे आकडे इतक्या वेगाने बदलत होते, की आधी पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री भूपेश बाघेल पिछाडीवरून पुढच्याच फेरीत आघाडीवर पोहाेचले. ताज्या माहितीनुसार सध्या काँग्रेस 45, तर भाजप 44 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र होते. सत्तेसाठी लागणारा बहुमताचा 46 हा जादुई आकडा अजून दोन्ही पक्षांना गाठता आलेला नाही.

दरम्यान, काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेन बघेल सुरुवातीला पिछाडीवर पडले होते, नंतर त्यांनी पुन्हा आघाडी घेतली आणि काँग्रेसचा जीव भांड्यात पडला. आघाडी व पिछाडीचे आकडे झपाट्याने बदलत असल्यामुळे छत्तीसगडमध्ये सत्ता कोणाची? हे पाहण्यासाठी आणखी काहीवेळ पाट पाहावी लागेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव हे मतमोजणीत आघाडीवर असून, त्यांनी छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या पाच वर्षांच्या राजवटीत राज्य असुरक्षित होते, कुठलाही विकास न केल्याने राज्याची वाट लागल्याचा आरोप केला. आता जनतेला कळून चुकले आहे, की भाजपच्या हाती सत्ता असेल तरच राज्य सुरक्षित राहू शकेल. त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून मते दिली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT