Mizoram, Chhattisgarh News Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election : छत्तीसगडमध्ये 71 टक्के तर मिझोराममध्ये 75 टक्के मतदान; काँग्रेस अन् भाजपचा विजयाचा दावा

Amol Jaybhaye

Mizoram Election News : मिझोराम आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (७ नोव्हेंबर) पूर्ण झाले. दोन्ही राज्यांतील मतदारांनी उत्साहाने मतदान केले. मिझोराममधील 40 जागांवर आणि छत्तीसगडमधील 90 पैकी 20 जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमधील 70 जागांसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मिझोराममध्ये 75. 68 टक्के आणि नक्षलग्रस्त राज्य छत्तीसगडमध्ये 70. 87 टक्के मतदान झाले. मात्र, अंतिम आकडेवारी येणे बाकी आहे. गेल्या वेळी छत्तीसगडमध्ये हा आकडा ७७ टक्के नोंदवला गेला होता. या निवडणुकीत कोणाला किती फायदा होणार आणि किती तोटा होणार हे ३ डिसेंबरच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) नक्षलग्रस्त भाग असलेल्या दंतेवाडाबाबत बोलायचे झाले तर, येथील मतदार कोणत्याही भीती शिवाय झाले.

हा भाग नक्षलवाद्यांचा मोठा बालेकिल्ला मानला जातो. तरीही बूथवर मतदारांचे फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आले. येथे मतदारांनी मतदानासाठी सकाळपासूनच मोठ्या मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे पुरुष मतदारांसोबतच महिलांमध्येही मतदानाचा विलक्षण उत्साह दिसून आला. सकाळपासूनच महिला मतदार मतदान केंद्रावर येऊ लागल्याने मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी विजयाचा दावा केला आहे. तसेच काँग्रेसनेही (Congress) विजयाचा दावा केला आहे. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले. यामध्ये राजनांदगावचाही समावेश आहे, जिथून माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे भाजपचे (BJP) उमेदवार आहेत. राज्यातील 20 जागांपैकी 12 जागा एसटीसाठी राखीव आहेत. राज्यात मंगळवारी (7 नोव्हेंबर) मतदान झालेल्या 20 जागांपैकी 12 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. आता ईव्हीएममध्ये कैद झालेल्या या जागांवर एकूण 223 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्याच्या भवितव्याचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT