Chhattisgarh Assembly Election Sarkarnama
देश

Chhattisgarh Assembly Election : निवडणूक रद्द करा, आयोगाविरुद्ध गुन्हा दाखल करा; अपक्ष उमेदवाराच्या मागणीने खळबळ...

High Court News : महिला बचत गटांची कर्जमाफी, महिलांना मोफत गॅस सिलिंडरसह आर्थिक लाभाचे प्रलोभन.

Jagdish Pansare

Bjp-Congress News : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक रद्द करून निवडणूक आयोगाविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी रायगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार राधेश्याम शर्मा यांनी केली आहे. (Chhattisgarh Assembly Election) भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे

मतदारांना आमिष दाखवण्याचा खुलेआम खेळ सुरू असताना केंद्र आणि राज्यातील निवडणूक आयोग त्याकडे उघड्या डोळ्याने पाहत आहे. (Congress) त्यामुळे निवडणूक आयुक्तांवरही फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. (Bjp) राधेश्याम शर्मा हे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. छत्तीसगड राज्यातील औद्योगीकरणासह विविध सामाजिक प्रश्नावर ते काम करतात. रायगड विधानसभा मतदारसंघातून शर्मा हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करताना त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली. (Chhattisgar) बेबी वॉकर निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या शर्मा यांनी याचिकेत आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेस, भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार, महिला बचत गटांची कर्जमाफी, महिलांना मोफत गॅस सिलिंडरसह आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवल्याचे म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केले असून, मतदारांना आमिष दाखवणाऱ्या दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे आचारसंहितेचे पूर्णतः उल्लंघन झाले आहे. निवडणूक रद्द करून राजकीय पक्षांना खुले संरक्षण देणाऱ्या केंद्र व राज्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

मतदानाच्या 48 तासांआधी काँग्रेस, भाजपने मोठ्या प्रमाणावर जाहिराती प्रसिद्ध केल्या. लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे यातून स्पष्ट उल्लंघन होत आहे. या संदर्भात आपण केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, त्यानंतरही काही कारवाई झाली नाही, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT