BJP Leader DEATH.jpg Sarkarnama
देश

Crime News: 'फॉर्च्युनर'च्या मागे-पुढे ट्रक लावून रस्त्यात गाठलं,पेट्रोल टाकून गाडी पेटवली; भाजपच्या बड्या नेत्यासह तीन जणांना निर्घृणपणे संपवलं

Chhattisgarh BJP News: छत्तीसगडमधील सोनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगानी गावात ही घटना मंगळवारी (ता.16 जून) रात्री घडली. या घटनेत फॉर्च्युनरच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करत पळून जाण्याचे मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर कारवर पेट्रोल ओतण्यात आले आणि लगेच, वाहनाला कथितरित्या पेटवून दिलं.

Deepak Kulkarni

Chhattisgarh Koriah : छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर येत आहे. वाळू उपशावरून सुरू असलेल्या कथित जुन्या वादाचे रूपांतर एका भयानक रात्रीत झाले. भाजप नेत्याच्या फॉर्च्युनर कारच्या पाठीमागे आणि पुढे ट्रक लावण्यात आले. यानंतर मध्ये असलेल्या कारला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. या संतापजनक घटनेत भाजप नेते आणि माजी जनपद पंचायत अध्यक्ष भरत सिंह यांच्यासह तीन जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सोनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगानी गावात ही घटना मंगळवारी (ता.16 जून) रात्री घडली. या घटनेत फॉर्च्युनरच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करत पळून जाण्याचे मार्ग बंद करण्यात आला. त्यानंतर कारवर पेट्रोल ओतण्यात आले आणि लगेच, वाहनाला कथितरित्या पेटवून दिलं. या गाडीत असलेले भाजप नेते आणि माजी जनपद पंचायत अध्यक्ष भरत सिंह (लल्ला सिंह)यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला होता.

लागलेल्या या हल्ल्यात इतर दोन व्यक्तींमध्ये वीरेंद्र सिंग, ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शिक्षक व भरत सिंग यांचे चुलत भाऊ नागेंद्र सिंग यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात मयंक सिंग यांच्यावर डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

पीडित नेत्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत सिंह हे वाळू उत्खननाशी संबंधित वादावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटी करायला गेले होते. त्याऐवजी त्यांना एका कटात अडकवण्यात आले. या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी या चार आरोपींना अटक केली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. नऊ आरोपींविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न यासह गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हिंसाचारामुळे छत्तीसगडमधील कोरियामध्ये प्रचंड दहशतीचं वातावऱण पसरलं आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव कायम असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, भरत सिंग यांच्या कुटुंबाला त्या भागातील वाळू उपशाचे कंत्राट देण्यात आले होते.

छत्तीसगडमधील सोनहट, कैलासपूर, तेलिमुडा, बेलिया आणि चिंगुरा येथे वाळू वाहतुकीवरील नियंत्रण आणि बेकायदेशीर खाणकामाच्या महसुलावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. हा वाद भरत सिंग यांचा गट आणि भाजप नेते मनोज त्रिपाठी यांच्या कुटुंबात अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचंही समोर येत आहे.

बैकुंठपूरला वाळू वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे टिपर ट्रक हे या घटनेतील आरोपी त्रिपाठी कुटुंबाच्या मालकीचे होते. सिंग आणि त्रिपाठी यांच्यातील वाद हा खाणीतून काढलेल्या वाळूच्या मोबदल्यावरून आणि नियंत्रणावरून चिघळला. येथे सुरू असलेला वाळू उपसा आणि खाणकामांच्या कंत्राटं ही या भागातील प्रभाव, दहशत आणि वर्चस्वासाठीच्या लढाईत बदलली आहे.

हाच वाद मंगळवारी रात्री भयानक वळणावर पोहोचला. तपासकर्त्यांच्या मते, भरत सिंग आणि इतर जण ज्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते. आरोपी आणि पीडित कुटुंबांमध्ये आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वावरुन अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता.

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भरत सिंह त्यांच्या साथीदारांसह निघाले होते. तेव्हा आरोपी हे रस्त्यात दबा धरुन बसले होते. त्यांनी सिंह यांना कथितरित्या घेरण्यात आले होते. एसयूव्हीच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करून पळून जाणार नाही याची खबरदारी घेतली.

त्यानंतर लगेचच, गाडीवर पेट्रोल टाकत लावलेल्या आगीत सिंह यांच्यासह तीन जणांना संपवण्यात आलं. या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना आरोपींना कोणत्याही प्रकारे सोडण्यात येणार नाही असा इशाराही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT