Chhattisgarh News: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेता भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी ईडी (ED)ने छापा टाकला आहे. आज पहाटे सहा वाजता भूपेश बघेल यांच्या भिलाई येथील निवासस्थानी ईडीचे पथक पोहचले असून कागदपत्रे तपासत आहेत. या कारवाईनंतर भूपेश बघेल यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भूपेश बघेल यांच्या कार्यालयाकडून टिवट् करण्यात आले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी अडानी यांच्याविरोधात विरोधीपक्ष आक्रमक होणार आहेत, या पार्श्वभूमीवर साहेबांच्या घरी (भूपेंद्र बघेल) यांच्या घरी सरकारने ईडीचे पथक पाठवले आहे,'असे टि्वटमध्ये म्हटलं आहे. दारुविक्री गैरव्यवहाराची संबधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भूपेश बघेल यांचे सुपुत्र चैतन्य यांच्याविरोधात ईडीने ही छापेमारी केल्याची माहिती आहे.
ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी करण्यात आली आहे. ईडीने यापूर्वी मार्च 2025 मध्ये चैतन्य बघेल यांच्याविरोधात छापेमारी केली होती. कथित दारुविक्री प्रकरणात चैतन्य भूपेल हे लाभार्थी असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. या गैरव्यवहारात छत्तीसगड सरकारचे मोठे नुकसान झाले असून हा गैरव्यवहार 2,100 कोटींचा असल्याचे ईडीचे म्हणणं आहे.
चैतन्य बघेल यांच्याविरोधात अवैध मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीनं त्यांच्याविरोधात आपली कारवाई अधिक गतिमान केली आहे. या प्रकरणामुळे छत्तीसगडचे राजकारण तापलं आहे, कारण भूपेश बघेल हे राज्यातील प्रमुख नेते आहेत. ते मुख्यमंत्री असताना हा गैरव्यवहार उघडकीस आला होता. या प्रकरणी ईडीनं अंतिम अहवाल दिला नसून तपास सुरु आहे. बघेल पिता-पुत्र यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.