Amit Shah Sarkarnama
देश

Amit Shah on Naxal encounter : शहांच्या प्लॅननुसार यंत्रणा सक्रीय; 8 जवानांच्या मृत्यूचा बदला, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

Chhattisgarh Naxal encounter latest news : छत्तीसगड-ओडिशा सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांशी केलेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान समोर आले आहे.

Rashmi Mane

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांशी केलेल्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मोठे विधान समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 8 सैनिक आणि ड्राइवर शहीद झाले होते. या वाहनात डीआरजी किंवा जिल्हा राखीव रक्षक दलाचे कर्मचारी प्रवास करत होते.

स्फोटकांनी भरलेले वाहन सुरक्षा दलांच्या ताफ्याजवळ उडवण्यात आले, ज्यामुळे वाहनाचे तुकडे झाले. हा हल्ला इतका भीषण होता की स्फोटाच्या ठिकाणी एक मोठा खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे छत्तीसगड-ओडिशा सीमेवर झालेला हा हल्ला नक्षलमुक्त भारत बनवण्याची दिशा बनवण्यामध्ये आपल्या सुरक्षा दलांचे हे मोठे यश आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये नक्षलवादाच्या विरोधात सुरक्षा दलांच्या मोठ्या यशाची माहिती दिली. 'नक्षलवादाला आणखी एक मोठा धक्का. नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेने आपल्या सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे', अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

अमित शाह यांनी पुढे लिहिले की, 'सीआरपीएफ, एसओजी ओडिशा आणि छत्तीसगड पोलिसांनी ओडिशा-छत्तीसगड सीमेवर संयुक्त कारवाईत 14 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. नक्षलमुक्त भारताचा आपला संकल्प आणि आपल्या सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नक्षलवाद आज अखेरचा श्वास घेत आहे.'

'2026 पर्यंत नक्षलमुक्त भारत'

गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत नक्षलमुक्त होईल, असा दावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादमुक्त करण्याचे ध्येय लक्षात घेऊन नक्षलवाद्यांवर सतत मोहिमा राबवल्या जात आहेत.

गेल्या दीड वर्षात छत्तीसगडमध्ये (Naxal free bharat) सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांविरोधात मोठे यश मिळाले आहे. या कालावधीत 300 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत, सुमारे 1000 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 837 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

असा केला 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

19 जानेवारीच्या रात्री ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या कुलारीघाट राखीव जंगलात मोठ्या संख्येने माओवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. येथे ६० नक्षलवादी उपस्थित होते. छत्तीसगड(Chhattisgarh) पोलिसांच्या ई-३० दलासह एसओजी (ओडिशा पोलिस) आणि सीआरपीएफचे संयुक्त आंतरराज्यीय ऑपरेशन सुरू करण्यात आले.

मैनपूरच्या भालुदिघी पर्वतांमध्ये सैनिकांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. सुरक्षा दलांनी दोन माओवादी कार्यकर्त्यांसह 14 नक्षलवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलांनी १ एसएलआरसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी जप्त केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT