AAP News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोट्याळ्याप्रकरणी सीबीआयने रविवारी (ता.२६) रात्री उशिरा अटक केली.
त्यांना सोमवारी (ता.२७) दुपारी राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
सीबीआयच्या तपासात सिसोदिया सहकार्य करत नसल्याचे सांगत त्यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्या अटकेनंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला. सिसोदिया यांच्या अटकेनंतर देशभरात आप चांगलच आक्रमक झालं.
तर दिल्लीतले राजकारणही चांगलच तापलं आहे. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्याबाबत केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
केजरीवाल म्हणाले, ''आमच्या दोन मंत्र्यांना त्यांनी तुरुंगात डांबलं आहे. सत्येंद्र जैन आणि मनिष सिसोदिया हे चांगले मंत्री होते. पण त्यांना मोदी सरकारने अटक केली.
मनिष सिसोदिया हे भाजपात गेले तर त्यांच्याविरोधातली सगळी प्रकरणं मागे पडतील, त्यांना क्लिन चीटही मिळेल. एवढंच नाही तर सत्येंद्र जैन यांनी देखील भाजपात प्रवेश केला तर सगळी प्रकरणं निकाली लागतील'', असं म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.