Eknath Shinde News Sarkarnama
देश

Eknath Shinde News : कुणाचे ट्वीट, कसल्या चर्चा अन् काय ? मोदी-शिंदेंची तर सदिच्छा भेट!

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde met PM Narendra Modi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटला गेले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करुन राजकीय उलथापालथीचे संकेत दिले. शिंदेंचा दिल्ली दौरा मिटकरींचे ट्वीट आणि अजितदादाचे मौन या साऱ्यांनी राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली. मात्र, पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगून राजकीय वर्तुळातील चर्चांवर स्वता:च पडदा टाकला. तरीही त्यावरुन शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी पसरल्याचे पाह्यला मिळाले.

या भेटीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, ''आमच्या कुटुंबाची इच्छा होती की पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घ्यावी. सर्वांनी भेट घेतली, सर्वांना समाधान वाटले. ही सदिच्छा भेट असली तरी मोदीजींनी खूप वेळ दिला. राज्यात सुरू असलेले प्रकल्प, पावसाची परिस्थिती यावर यावेळी साधक-बाधक चर्चा झाली.''

''राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आणि प्रकल्प देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू केले होते. ती सर्व काम मधल्याकाळात रखडली होती. आम्ही सत्तेत आल्यानंतर पुन्हा ती कामे आम्ही सुरू केली आहेत. त्यावर ही चर्चा झाली. राज्यातील पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या योजना यावर चर्चा झाली. मेट्रो प्रकल्प, मराठवाडा वॅाटर ग्रीड, पावसाचे पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळवावे यावरही चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.''

''राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल, असे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले, असेही शिंदे यानी सांगितले. यावेळी शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, चार दिवसांपूर्वीच 'एनडीए'च्या बैठकीसाठी तुम्ही दिल्लीत आला होतात. त्यावर शिंदे म्हणाले, ती एनडीएच्या घडक पक्षांची बैठक होती. यावेळी आम्ही कुटुंबासह आलो होतो. पंतप्रधानांची भेट घेऊन माझ्या वडिलांना आनंद झाला. आमच्या चार पिढ्यांना आज पंतप्रधानांना एकत्र भेटता आले.'' चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT