chaina, indian
chaina, indian  Sarkarnama
देश

China News : चीनमधील भारतीय विद्यार्थी,नोकरदार असुरक्षित; 'ही' धक्कादायक माहिती समोर

सरकारनामा ब्यूरो

Chaina News : डोकलाम घटनेनंतर चीनमध्ये भारतीयांवर हल्ल्यात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान, चीनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत चीनी लोक भारतीय व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात येत असल्याचं दिसत आहे. चीनमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून अर्थात सप्टेंबरपासून चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर 50 हून अधिक मारहाण आणि लुटमारीच्या घटना घडल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे.

भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यानंतर चीन(China)मधील भारतीय दूतावासाने देखील आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डोकलाम घटनेनंतर चीनमध्ये भारतीयांवर हल्ले वाढले आहेत. भारतीय दूतावासानेही या हल्ल्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात सप्टेंबरपासून चीनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत जवळपास 50 हून अधिक मारहाण आणि लुटमारीच्या घटना घडल्या आहेत समोर आलं आहे. चीनमधील भारतीय दूतावासातील एका अधिकार्यानं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चिनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओतील घटना ऑक्टोबर 2022 मधील आहे.या व्हिडीओत चीनच्या ग्वांगझू शहरातील मेट्रो ट्रेनप्रवासादरम्यान, चीनीप्रवाशांनी भारतीय विद्यार्थ्यांसोबत वादावादीला सुरूवात केली. यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात वेळातच वातावरण तापले आणि अनेकांनी मिळून दोन मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्टेशनवर ट्रेन उभी राहिली, फाटक उघडले, मारहाण करणाऱ्यांनी दोन्ही मुलांना बाहेर ढकलले. प्लॅटफॉर्मवरही ते या दोन मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते.

मेट्रो स्टेशनचा गार्ड जवळच उभा होता, पण त्याने हल्लेखोरांना रोखले नाही.मारहाण करणारे लोक चिनी असून दोन्ही मुले भारतीय होती. वादावादी का झाली, मारहाण करणाऱ्यांवर काय कारवाई झाली, मारहाण झालेल्या दोन मुलांचे काय झाले, याची काहीही माहिती नाही.

चीनी मीडिया भारतीयांवरील अशा हल्ल्यांशी संबंधित प्रकरणं सतत दाबत असून पोलिसही अशी प्रकरणं समोर येऊ देत नाहीत. यापूर्वीही माझ्या एका मित्रासोबत असे घडलं होतं, परंतू, यावर कोणतीही कारवाई झाली नाही अशी प्रतिक्रिया चीनमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनं दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT