Hardeep Singh Nijjar Case : Sarkarnama
देश

Hardeep Singh Nijjar Case : हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे चीनचा मास्टरप्लॅन; महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट

India-Canada Internation News : कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील वाद चांगलाच चिघळला होता.

अनुराधा धावडे

New Delhi : कॅनडातील खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत आणि वाद विकोपाला गेला आहे. हा विषय ताजा असतानाच चिनी वंशाच्या एका महिला ब्लॉगरने, निज्जरच्या हत्येमागे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एजंट सामील होते, असा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर या हत्येमागे भारत आणि पाश्चिमात्य देशांत मतभेद निर्माण करणे, हा चीनचा उद्देश असल्याचा दावाही तिने केला.

जेनिफर झेंग असे या महिलेचे नाव असून, त्या चिनी वंशाच्या महिला पत्रकार आहेत. सध्या अमेरिकेत राहतात. जेनिफर झेंग यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये यावर भाष्य केले. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, झेंग यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून निज्जरच्या हत्येबाबत मोठा खुलासा केला आहे. निज्जरच्या हत्येमागे चीनमधील चीन कम्युनिस्ट पार्टीच्या एजंटांचा हात होता.

18 जून 2023 रोजी कॅनडातील खलिस्तानी चळवळीचा हरदीपसिंग निज्जरची सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या लष्करी रणनीतीच्या अनुषंगाने जगाला विस्कळीत करण्यासाठी सीसीपीच्या ‘इग्निशन प्लॅन’चा हा एक भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. झेंग यांनी चिनी लेखक आणि YouTuber लाओ डेंग यांचा हवाला देऊन आरोप केले आहेत. लाओ हेदखील कॅनडामध्ये राहतात.

काय म्हटलं आहे जेनिफर झेंग यांनी ?

"लाओने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या जूनच्या सुरुवातीला चीनच्या 'इग्निशन प्लॅन'चा एक भाग म्हणून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला सिएटल, अमेरिका येथे पाठवले. या ठिकाणी एक गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत आणि पाश्चिमात्य देशांमधील संबंध बिघडवणे हा या बैठकीचा हेतू होता, असा दावा झेंग यांनी केला.

इतकेच नव्हे तर "कॅनडातील शीख नेते हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्याचे काम चिनी एजंट्सला सोपवण्यात आले होते. बैठकीनंतर सीसीपी एजंट्सनी अत्यंत सावधपणे हत्येची योजना आखली होती.

या योजनेनुसार, "18 जून रोजी आवाज न करणाऱ्या बंदुकांनी सज्ज असलेल्या एजंट्सनी निज्जरची हत्या केली. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी निज्जरच्या कारची झडती घेतली. त्यांनी डॅश कॅमेरा तोडला. हत्येनंतर एजंट पळून गेले. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व शस्त्रे जाळली. दुसऱ्याच दिवशी ते कॅनडातून बाहेर पडले, असाही दावा झेंग यांनी केला. तसेच ज्या चिनी एजंट्सने निज्जरची हत्या केली, त्यांनी भारतीयांकडून बोलले जाणारे इंग्रजी भाषेतील उच्चार शिकले होते.

दरम्यान, आतापर्यंत चीनने जेनिफर झेंगच्या आरोपांना उत्तर दिलेले नाही. भारतानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT