CJI BR Gavai: भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याविरोधात सध्या सोशल मीडियातून अपप्रचार केला जात आहे. नुकतेच त्यांच्यावर भर कोर्टात एका सनातनवादी वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच काही समाजकंटकांकडून CJI गवई यांना शिवीगाळ आणि आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांना शिवीगाळ करणाऱ्या 100 हून अधिक ट्विटर हँडलवर पंजाब सरकारनं कारवाई केली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांना शिवीगाळ करणाऱ्या आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणाऱ्या 100 ट्विटर हँडलची पंजाबमधील आपच्या भगवंत मान सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या ट्विटर अकाऊंट्सवर पंजाब सरकारनं अनुसुचित जाती-जमाती अत्याार प्रतिबंध कायद्यांतर्गत अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत FIR दाखल केला आहे. देशाचे सरन्यायाधीश हे आपल्या समाजाचं सुप्रीम कोर्टात प्रतिनिधीत्व करतात अशी पंजाबमधील बहुतांश जनतेची भावना आहे. कारण पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर दलित समाज आहे. त्यामुळं या बहुजनांच्या भावनांचा आदर करत CJI गवईंना अत्यंत खालच्या शब्दांत टीका करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं पंजाबमधील एका मंत्र्यानं म्हटलं आहे.
दरम्यान, पंजाब सरकारच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे तर अनेकांनी टीकाही केली आहे. कारण काही जणांच्या मते आपलं नाव विनाकारण FIR च्या यादीत आलं आहे. तर काहींनी पंजाब सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अशा स्वरुपाची कारवाई खरंतर केंद्रातील मोदी सरकारनं सुमोटो घेऊन करायला हवी होती. पण ती पंजाब सरकारनं केल्यानं त्यांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे.
खजुराहो इथल्या अनेक मंदिरांपैकी एका मंदिरात भगवान विष्णूची मुर्ती भग्नावस्थेत आहे. या मूर्तीची फार पूर्वी आक्रमकांनी तोडफोड केली आहे. या मूर्तीचं रिस्टोरेशन अर्थात ती दुरुस्त करण्यात यावी अशी याचिका एका वकिलानं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ही याचिका सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हा विषय पुरातत्व खात्याच्या अखताऱ्यातील येतो त्यामुळं सुप्रीम कोर्ट यामध्ये दखल घेऊ शकत नाही असं सांगत याचिका फेटाळली होती. कोर्टानं याचिका फेटाळल्यानंतरही संबंधित वकील तावातावानं आपली बाजू सरन्यायाधीशांपुढे मांडतच होता. त्यामुळं वैतागलेल्या CJI भूषण गवई यांनी संबंधित वकिलाला म्हटलं की, तुम्ही जर इतकेच धार्मिक आहात तर सर्वकाही ठीक होण्यासाठी तुम्हीच देवाकड प्रार्थना करा.
सरन्यायाधीशांच्या या सर्वसाधारण टिप्पणीवर कट्टर सनातनवादी वर्ग नाराज झाला आणि या वर्गानं सरन्यायाधिशांच्या विधानाचा भलताच टोकाचा अर्थ काढत त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. अनेकांनी तर त्यांच्या जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. याच घटनेचा धागा पकडत तीन दिवसांपूर्वी एका ७२ वर्षीय सुप्रीम कोर्टातील वकिलानं सरन्यायाधिशांसमोर बोलत असताना आपल्या पायातली बूट काढून तो सरन्यायाधिशांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आधीची घटना अनेकांना माहिती नसताना वकिलानं केलेल्या कृत्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवला जाऊ लागला. त्यातच काही जणांनी सरन्यायाधीशांवरच टिका-टिप्पणी सुरु केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.