CJI Dhananjaya Chandrachud News Sarkarnama
देश

CJI DY Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या मित्राचा अपघात...सहानुभूती अन् तरीही पराभव!

College Election : चंद्रचूड आणि कौल यांच्यातील मैत्री जवळपास ४७ वर्षांची आहे.

Rajanand More

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश संजय किशन कौल (Sanjay Kishan Kaul) हे शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांचे महाविद्यालयीन जीवनापासूनचे मित्र. त्यामुळे कौल यांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांनी आपल्या मित्राविषयीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये त्यांनी एका निवडणुकीत झालेल्या पराभवाची गोष्टही सांगितली.

चंद्रचूड आणि कौल यांच्यातील मैत्री जवळपास ४७ वर्षांची. पहिल्यांदा दोघांची भेट झाली ती स्टीफन कॉलेजमध्ये. आणीबाणीनंतरची त्यांची पहिलीच तुकडी होती. कॅन्टीनमधील तासन् तास चालणाऱ्या गप्पा आणि रंगभूमीविषयीच्या प्रेमामुळे आम्ही झाल्याचे चंद्रचूड यांनी सांगितले. महाविद्यालयातील निवडणुकीची (College Election) आठवणही त्यांनी करून दिली.

‘महाविद्यालयात असताना कौल यांनी विद्यार्थी निवडणूक लढवली होती. आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा होता. मी अभ्यासात हुशार असल्याने निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. त्याकाळा संजय लाल रंगाची कार वापर होता. एकेदिवशी त्याचा अपघात झाला. या अपघातानंतर आम्हाला वाटले की सहानुभूती मिळेल. त्यामुळे मते मिळतील. पण तसे काहीच झाले नाही,‘ असे सांगत चंद्रचूड यांनी निवडणुकीतील पराभवाची आठवण करून दिली.

सेंट स्टीफन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड आणि कौल हे दिल्ली विद्यापीठातील कॅम्पस लॉ कॉलेजमध्येही एकत्र शिकले. तिथून त्यांनी विधी पदवी संपादन केली. ‘मी नशीबवान आहे की, कौल यांनी विधी अभ्यासक्रम निवडला. कारण ही त्यांची पहिली पसंती नव्हती. त्यांना प्रवासाची आवड होती. त्यांनी भारतीय परकीय सेवेत जावे, असे वाटत होते. पण तत्कालीन सरन्यायाधीश बी. एन. कृपाल यांनी त्यांचे मन वळवले,’ असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT