CJP Delhi Protest: नवी दिल्लीत आज कॉक्रोच जनता पार्टीनं मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे, पण सरकरनं अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतलं आहे. तरीही आंदोलन करण्यावर सीजेपी ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून आजचं आंदोलन थांबणार नाही, या आंदोलनाचं नेतृत्व सीजेपी सदस्य अजिंक्य शिंदे करेल अशी घोषणा त्यांनी केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवर अभिजीत दिपके यांचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिपके सांगतात की, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळं आमच्यानंतर या मोहिमेचं नेतृत्व अजिंक्य करेल, त्यामुळं जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी कृपया अजिंक्य शिंदेला फॉलो करावं.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी हा व्हिडिओ काल रात्रीत चित्रीत करुन ठेवला असल्याचीही माहिती समोर येत आहे. उद्या आपल्याला पोलीस अटक करतीलच हे आधीच माहिती असल्यानं तसंच इंटरनेट सेवा बंद राहणार असल्यानं नवा व्हिडिओ शेअर करता येणं शक्य नसेल याचा अंदाज असल्यानं दिपकेंनी हा व्हिडिओ आधीच शूट केला असल्याचं काही माध्यमांनी आपल्या वृत्तामध्ये सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.